शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान – मनोहर महाराज सायखेडे : बेलगाव कुऱ्हे येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य शिवचरित्र कथा सोहळा सुरू

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, […]

शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांसाठी झटणारे गोरख बोडके यांचा सार्थ अभिमान – ॲड. संदीप गुळवे : घोटी बाजार समितीतर्फे गोरख बोडके यांचा सत्कार सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ सामान्य जनतेसाठी २४ तास सुद्धा कमी पडत असणारे व्यक्तिमत्व म्हणून गोरख बोडके यांचा नेहमीच अभिमान वाटतो. कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाजार समितीमध्ये कायमच अग्रेसर राहून त्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात. जिल्हा नियोजन समितीवर त्यांची झालेली निवड शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना साकार व्हायला उपयुक्त आहे. गोरख बोडके माझे लहान भाऊच असून उत्तरोत्तर […]

कार्यकुशल बंधू – नामदार बाळासाहेब थोरात साहेब…!

लेखन : सौ. दुर्गा सुधीर तांबे, मा. नगराध्यक्षा संगमनेर, संपर्क ९८२२५५३२५४ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगामधील “अकोले” तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणार्‍या अमृतवाहिनी “प्रवरा” नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला “जोर्वे” हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरा आहे. श्री क्षेत्र दत्त महाराजांचे पुरातन मंदिर प्रवरा नदीच्या काठावर आहे. जोर्वे […]

भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिकाचा साकुर ग्रामस्थांकडून वाजतगाजत सन्मान : तरुण पिढीने आदर्श घेण्यासाठी गावकऱ्यांनी केले आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा गावकऱ्यांना अभिमान असतो. इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील हवालदार शिवनाथ कौसाबाई रंगनाथ सहाणे भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंट बटालियन मधुन १८ वर्षची प्रदीर्घ देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावचे सुपुत्र […]

इगतपुरी तालुक्याचे विकासपुरुष गोरख बोडके यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडून ५ वर्षासाठी लागली वर्णी

इगतपुरीनामा न्यूज, दि ३१ इगतपुरी तालुक्यातील विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही महत्वपूर्ण निवड केली आहे. ह्या समितीमध्ये जिल्ह्यातील अन्य व्यक्तींची सुद्धा निवड झाल्याचा शासन निर्णय निर्णय निर्गमित झाला आहे. […]

शेतकरी, कामगार आणि श्रमिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुष्यभर झपाटलेले दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव गोडसे

कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांचे नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. संसरी ता. जि. नाशिक येथील स्वातंत्र्यसैनिक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते समाजकारणात नेहमी अग्रेसर असणारे नामदेवराव शिवराम गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्याचबरोबर ते इगतपुरीचे पहिले आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने, माजी आमदार दिवंगत कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसरे, […]

कवितांचा मळा : “अनाथांची माय”

कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ चौदा नोव्हेंबर एकोनाविशे,अठ्ठेचाळीस साली !बाप अभिमन्यू साठ्यांची,सिंधुताई जन्मास आली !!                     अवांच्छित जन्मली सिंधू,                    चिंधीची सिंधु झाली !                    न कळे हाल कुणा सिंधूचे,                    गुराखी सिंधुताई बोली !! श्रीहरी सपकाळ नवरदेव,सिंधू बोहल्यावर चढली !बारा वर्षांची चिंधुताई,सासुरवासीन बनली !!                     इयत्ता चौथी शिक्षित माई,                    संघर्षाने पेटली !                    शेणकुर […]

शहीद परिवार सन्मान जनजागृती अभियानांतंर्गत जिल्ह्यातील शहिदांच्या परिवाराचा झाला सन्मान : माजी सैनिक विजय कातोरे, रेखा खैरनार यांचा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ इगतपुरी तालुक्यातील माजी सैनिक विजय कातोरे व वीरनारी संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष रेखा खैरनार यांनी नाशिक जिल्ह्यात शहीद परिवार सन्मान जनजागृती अभियान सुरू केलेले आहे. ह्या अभियानांतंर्गत सटाणा तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यात आल्या. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. प्रथम भाक्षी गावातील मरणोप्रांत शौर्य […]

गावाचे नाव देशपातळीवर उंचावणाऱ्या ११ मौल्यवान रत्नांचा गावकऱ्यांकडून होणार जोरदार सन्मान : इगतपुरी तालुक्यातील प्रेरणादायी सोहळा होणार ७ जानेवारीला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ गरिबीच्या परिस्थितीचा सामना, शैक्षणिक जागृतीचा अभाव, रात्रंदिवस जगण्याची भ्रांत आणि वर्षानुवर्षाच्या मानसिकतेच्या दबावाखाली मोठीमोठी स्वप्ने पाहूनही ती अपूर्ण राहतात. मात्र ह्या सगळ्या अडचणींचा सामना करून आपल्या ध्येयसिद्धीची वाटचाल आणि आईवडिलांची स्वप्नपूर्ती करणारे गुणवंत सन्मानाला प्राप्त होतात. आपले आईवडील, शिक्षक, गांवकरी यांच्या मनांतील अपेक्षांपेक्षा उत्तुंग कामगिरी करणाऱ्या देवळे ता. इगतपुरी येथील ११ […]

चिंचलेखैरे शाळेने केले अनोख्या पद्धतीने अभिवादन : त्रिंगलवाडी किल्ला सर करून साजरी केली सावित्रीबाई फुलेंची जयंती

इगतपुरीनामा न्यूज दि. ३ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्व सावित्रीच्या लेकी घेऊन त्रिंगलवाडी किल्ल्यावर जाऊन सावित्रीबाईंच्या ओव्या गाऊन पुष्पहार अर्पण मोठ्या अभिमानाने साजरी करण्यात आली. आम्ही काही कमी नाही या उक्तीप्रमाणे आदिवासी दुर्गम भागातील सावित्रीच्या लेकी, विद्यार्थी व शिक्षक यांनी […]

error: Content is protected !!