इगतपुरीनामा न्यूज, दि ३१
इगतपुरी तालुक्यातील विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही महत्वपूर्ण निवड केली आहे. ह्या समितीमध्ये जिल्ह्यातील अन्य व्यक्तींची सुद्धा निवड झाल्याचा शासन निर्णय निर्णय निर्गमित झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध भागात विविध विकासकामे आणि सामाजिक कार्यात अव्वल स्थान असणारे गोरख बोडके तालुक्यासह जिल्हाभरात विकासपुरुष म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने इगतपुरी तालुक्यातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून गावागावातून अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनीं माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून विकासाच्या कामांना प्राधान्याने करण्यात येईल असे नवनियुक्त जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पंचायती व नगरपालिका यांच्या गरजा लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यासाठी विकास योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्यानुसार शासनाकडून जो निधी वर्ग होतो. त्याचे नियोजन, विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, विकासकामे सुचविणे आदी कामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केली जातात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याची जबाबदारी या समितीवर सोपविलेली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या धमण्या म्हणून ही समिती ओळखली जाते. ह्या समितीच्या सदस्यपदी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची निवड उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील अनेकांचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांत ग्रामविकासाची विकासकामे, सक्षमतेने सामाजिक कार्याद्वारे गावांचा कायापालट आणि सामाजिक कार्य यामध्ये गोरख बोडके अव्वलस्थानी आहेत. ५ वर्षासाठी त्यांची निवड जिल्हा नियोजन समितीवर करण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यात विकासगंगा आणण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. गोरख बोडके यांची सार्थ निवड असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.