
इगतपुरीनामा न्यूज – १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत सिन्नर येथे राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून श्री “अन्न निरंतर” मिलेट फेस्टिवल २०२५ सुरु आहे. ह्या फेस्टिवलमध्ये आज खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार एकूण त्यामध्ये मिलीगेंस, वसुंधरा ऑरगॅनिक परिवार, ए. बी. गृहोद्योग, रहेजा ग्रुप, सर्वज्ञ फूड्स, अश्विनी टांकसाळे हे ९ खरेदीदार उपस्थित होते. विक्रेत्यांमध्ये कळसुबाई शेतकरी उत्पादक कंपनी अकोले (अहिल्यानगर ), सेंद्रिय शेतकरी मित्र शेतकरी उत्पादक कंपनी घोटी, वुमन्स पॉवर शेतकरी उत्पादक कंपनी इगतपुरी, महिला बचत गट, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून निर्माण केलेल्या विविध उत्पादनाचे १७ उद्योजक उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीला उपस्थित खरेदीदार यांनी खरेदी करावयाच्या वस्तूंची माहिती व स्वतःचा परिचय करण्यात आला. त्यानंतर उपस्थित विक्रेते यांच्याकडील उत्पादित मालाची खरेदीदारांना माहिती व परिचय करण्यात आला. मिलेट उत्पादक शेतकरी व खरीदार यांच्यामध्ये राऊंड टेबलवर मिलेट प्रतवारी, पॅकिंग, दराबाबत चर्चा घडवून आणण्यात आली. PMFME योजनेतील उत्पादित कांदा करप निर्जंलीकरण केलेल्या फळे,भाजीपाला, मिरची पावडर, मसाले, मिलेट उत्पादित कुकीज बाबत १० सामंजस्य करार करण्यात आले. नाशिक येथील श्री वैभव भावसार मार्केटिंग, ब्रॉन्डिंग पॅकेजिंग बाबत उपस्थित शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट, उद्योजक यांना सविस्तर माहिती देण्यात आली. खरेदीदार विक्रेता संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर वरूण पाटील, महेश वेटेकर, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.