कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
चौदा नोव्हेंबर एकोनाविशे,
अठ्ठेचाळीस साली !
बाप अभिमन्यू साठ्यांची,
सिंधुताई जन्मास आली !!
अवांच्छित जन्मली सिंधू,
चिंधीची सिंधु झाली !
न कळे हाल कुणा सिंधूचे,
गुराखी सिंधुताई बोली !!
श्रीहरी सपकाळ नवरदेव,
सिंधू बोहल्यावर चढली !
बारा वर्षांची चिंधुताई,
सासुरवासीन बनली !!
इयत्ता चौथी शिक्षित माई,
संघर्षाने पेटली !
शेणकुर मोबदला द्यावा,
म्हणुन पेटुन उठली !!
दमडाजी असतकर नामे,
सिंधुताईशी दुखावली !
सिंधुचे चारित्र्य दमडाजी,
हनन करीत राहिली !!
नवरा श्रीहरी सिंधुताईशी,
मारुन टाकण्या बोली !
गर्भवती अर्धमेल्या सिंधुची,
आई गोमाता झाली !!
कन्या जन्माने मरणाची,
इच्छा सरुन गेली !
आत्महत्या करु नको गं,
ममता सांगू लागली !!
भटकती भिकारीण सिंधुताई,
भिकाऱ्यांची होई वाली !
भाजून सरणावर पीठ भाकरी,
आपल्या पोटात घाली !!
भिकाऱ्यांना देताच माया,
म्हणे आमची आई आली !
शेकडो अनाथ बालकांशी,
माई पदर देत गेली !!
निस्वार्थी दान मागत गेली,
अनाथांची सावली !
कर्म करोनिया सत्यवचने,
महानुभाव जन्मली !!
सिंधुताई अभिमाने सांगती,
गोमाताच सखी माऊली !
भाकड गाई सांभाळ करी,
होई गाईंची सावली !!
देह पुरुन करा अंत्यसंस्कार,
माई काव्यात बोलली !
चार जानेवारी विससे बावीसला,
पद्मश्री भूगर्भात विसावली !!