इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात सातत्याने जनसेवा आणि ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटलेले जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्यासारखे मित्र लाभल्याचा आनंद होतो. ज्यांचे स्थान जनतेच्या हृदयात आहे असे ते सुप्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील २० गावांसाठी प्रत्येकी १० लाख असे २ कोटी रुपये किमतीची विकासकामे देण्याचे आदेश दिले आहेत. गोरख […]
भाविकांनी लाभ घेण्याचे तालुका सेवा समितीचे आवाहन भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या विचारांवर इगतपुरी तालुक्यातील हजारो भाविक अढळ निष्ठा ठेवतात. महाराष्ट्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आपल्याला सोपवलेल्या जबाबदारीची सेवा सुद्धा अनेक सेवेकरी नियमित करीत असतात. यासह गावोगावी आपल्या आदरणीय माऊलींचे प्रेरणादायी विचार […]
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा सेवाकार्य आणि मानवता ह्या दोन्ही गुणांची अलौकिक देणगी लाभलेले मोडाळे येथील स्व. डॉ. त्र्यंबक काळूजी शेंडगे हे इगतपुरी तालुक्यातील आदिवासी जनतेच्या हृदयात आहेत. गेली ३० वर्ष धीरोदत्तपणे मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव भागातील लोकांच्या सेवेला वाहून घेण्याचे कार्य त्यांनी अखेरपर्यंत केले. अहोरात्र वैद्यकीय सेवा देतांना लोकांना आधार देऊन उभे […]
लेखन – हभप जालिंदर महाराज रेरे, कीर्तनकार, खैरगावदेविदास भगवंता हिंदोळे, प्राथ. शिक्षक पिंपळगाव भटाटा ज्या मातीमध्ये जन्म घेऊन जगणे शिकलो ती पावन माती, जन्म देणारी माता आणि आपला समाज ह्या त्रिसूत्रीला विसरू नये. कृतज्ञतेची कास धरून जनतेच्या हृदयातील परम परमात्मा पांडुरंग परमेश्वर प्रसन्न होईल असे नित्य कार्य करीत राहावे. अशा प्रकारची शेकडो नीतिमूल्ये ज्यांच्या धमन्यांमध्ये […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० छत्रपती शिवरायांचे विचार दगडालाही मोती बनवु शकतात. ह्या विचारांच्या सुसंस्कारांची पेरणी प्रत्येक माणसात व्हावी. शिवरायांच्या विचारांसह सामाजिक कार्याचा ठसा उमटवावा. यासाठी इगतपुरी तालुक्यातील रुपेश हरिश्चंद्र नाठे हा ध्येयवेडा युवक झपाटून काम करीत आहे. संपूर्ण कुटुंब आणि सहकारी मित्रांसह कामाला झोकून घेतलेल्या ह्या युवकाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आशिया खंड स्तरावरील संघटनेने घेतली […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ पक्की जिद्ध, उच्च ध्येय आणि उच्चतम कार्य उभे करण्याचा ध्यास असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नसते. बिकट आर्थिक परिस्थिती, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, जाण्यायेण्याची भ्रांत अशा कितीही अडचणी असल्या तरी मनात असलेला दुर्दम्य आशावाद पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्या परिस्थितीच्या छाताडावर बसून यशाला गवसणी घालणारे एक व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ कोरोनाचा खडतर काळ…ऑक्सिजनचा जीवघेणा तुटवडा..पेशंटच्या बेडचा अभाव…इंजेक्शन अन प्लाझ्माचे दुखणे… आणि जगण्यासाठी काय करायचे याची भ्रांत…!!! अशा बिकट काळात इगतपुरी तालुक्यासह इतरही भागाला जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या रूपाने खरा परमेश्वरी देवदूत लाभला. ह्या संकटकाळात जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणारे लोक […]
इगतपुरी तालुक्याचा कोहिनुर हिरा आदरणीय लोकनेते स्व. गोपाळराव तथा दादासाहेब गुळवे सामान्य शेतकरी कुटुंबातून तालुक्यालाच नाही तर राज्याला लाभले. बेलगांव कुऱ्हे सारख्या छोट्या खेड्यात जन्मलेले लोकनेते गोपाळराव गुळवे हेच ते तालुक्याचे अमोल रत्न. नासिक जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये मैत्रीचे संबंध असणारा हा शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारा लोकनेता. इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्याला राजकारण आणि समाजकारण यांचा आदर्श त्यांनी दिलेला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ १२ महिने २४ तास आपल्या कार्यकर्तृत्वाने लोकांच्या मनामनात अधिराज्य गाजवणे अजिबात सोपे नाही. अन त्यांच्या मेंदूत प्रत्येक क्षणाला फक्त लोककल्याणाचा विचार सुरू असतो. त्यामुळेच अनेक लोकांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान आपल्या भरभक्कम कार्याने अबाधित केले आहे. असे दिलखुलास व्यक्तिमत्व तथा जिल्हा नियोजन समितीचे नूतन सदस्य गोरख बोडके आजपासून “जननायक” म्हणून ओळखले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ सिहांसनाधीश्वर…योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा अनेकानेक घोषणा देत शेकडो शिवभक्त गावागावात शिवजयंती साजरी करीत आहे. घराघरात शिवाजी महाराजांच्या जन्मानिमित्त अभूतपूर्व उत्साह संचारलेला असून इगतपुरी तालुक्यात जणू काही शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी विविध कार्यक्रम, व्याख्याने, सामाजिक कार्यक्रम आणि विचारांची देवाणघेवाण करणारे कार्यक्रम होताहेत. मिरवणुकांत सहभागी […]