
इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडणारे पत्रकार प्रा. तुकाराम रोकडे यांना नाशिकच्या मनू मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वृत्तांकन करणाऱ्या अठरा पत्रकारांना आणि पंधरा वृत्तवाहिनी पत्रकारांना पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना मनु मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त पत्रकार भुषण पुरस्कार देऊन ३३ पत्रकार बंधू भगिनींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. यामध्ये आदिवासी भागात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय घडामोडीचे वृत्तांकन करून समस्यांवर प्रकाश टाकणारे प्रा. तुकाराम रोकडे यांना पत्रकारितेतील विशेष पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी निर्भीड ज्योत न्यूज संपादक आशा मोरे, ग्राहक रक्षक समिती संस्थापक, अध्यक्ष आशाताई पाटील, बागलाण शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, मनू मानसी सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघाताई शिंपी, ज्योती केदारे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.