
इगतपुरीनामा न्यूज – शिवसेनेच्या इगतपुरी उपतालुकाप्रमुखपदी वाघेरे येथील कट्टर शिवसैनिक बाळासाहेब धांडे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख विजयअप्पा करंजकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब धांडे यांची निवड केल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा ज्वलंत विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इगतपुरी तालुक्यात शिवसेनेने दिलेली महत्वाची जबाबदारी पार पाडून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्यात येईल. गावागावात शिवसेना पक्षाचा विचार आणि शिवसैनिक जोडून चांगले काम उभे करू असा शब्द यावेळी उपतालुकाप्रमुख बाळासाहेब धांडे यांनी दिला.