लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम केल्यास समृद्धी लाभेल – खंडेराव शिवराम झनकर : बारशिंगवे येथे लोकनेते प्रतिष्ठान ग्रुपतर्फे जयंती साजरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयात अबाधित स्थान असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम केल्यास समृद्धी लाभेल. त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून साहेबांच्या चिरंतन स्मृती जागरूक ठेवल्याने लोकाभिमुख कार्याचा आलेख निश्चितच वाढेल. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन फक्त लोकांच्या कामाला वाहून घेणाऱ्या लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांना वंदन करतो असे प्रतिपादन शिवसेना, राष्ट्रमाता जिजाऊ […]

महापुरुषांच्या प्लेक्सची छेडखानी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांशी बोलणार – जिल्हाधिकारी डी. गंगाथरण : स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तृत चर्चा करून दिले निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे छायाचित्र असलेल्या फ्लेक्सबाबत दुष्कृत्य केल्याबद्दल वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात कळवण्यात आले आहे. मात्र अद्याप संबंधित समाजकंटकांवर काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती निर्धास्त झाल्या असून आगामी काळात त्यांच्याकडून विघातक घटना घडण्याची दाट शक्यता आहे. संबंधित गुंड प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांना निर्देश […]

स्पर्धा परीक्षाद्वारे सुलभ यश मिळवण्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करून निर्विवाद यशाचे मानकरी व्हा – डॉ. प्रताप दिघावकर : ग्रामविकासाच्या नव्या पॅटर्नमुळे मोडाळेचे ओळख महाराष्ट्राला झाल्याचे केले कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 मोठी स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी अविरत कष्ट घेण्याची तयारी असल्यास कोणतेही मोठे उद्धीष्ठ पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोडाळे येथील अभ्यासिकेमुळे देशाच्या आणि राज्याच्या सेवेतील उच्च अधिकारी होण्याची संधी आहे. यासाठी गोरख बोडके आणि आम्ही अधिकारी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहोत. स्पर्धा परीक्षाद्वारे सुलभ यश मिळवण्यासाठी […]

इगतपुरीतील ५० सरपंचांचा राळेगणसिद्धी, हिवरे बाजार येथे विशेष अभ्यास दौरा ; पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याकडून स्वागत : डिपीडीसी सदस्य गोरख बोडके साधणार समृद्ध ग्रामविकासासाठी सक्षम सरपंचांची फौज

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29 समृद्ध ग्रामविकास साधण्यासाठी सक्षम सरपंचांची भक्कम फौज कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके नेहमीच दोन पावले पुढे असतात. यासाठी त्यांनी स्वखर्चाने अभिनव अभ्यासदौरा आयोजित करून इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील ५० सरपंचांना अभ्यासदौऱ्यात सहभागी करून घेतले. विकासासाठी रात्रंदिवस सूक्ष्मपणे काम करून राज्यासमोर आदर्श घडवलेल्या विकासाचा आलेख त्यांना दाखवण्यात आला. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी […]

संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू ; स्व. कारभारी ( दादा ) गिते यांच्यासारख्यांचे नाव घेतले तरी पुण्य : हभप उद्धव महाराज चोले यांचे कीर्तनात सुंदर निरूपण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू आहेत. निरामय, निरपेक्ष स्नेह देणारे कारभारी दादांसारखे सज्जन व्यक्तिमत्व सर्वांना प्रगतीची वाटचाल करायला शिकवतात. लोकांच्या हृदयात असलेल्या पांडुरंगाशी एकरूप होऊन मनापासून सेवेचे पुण्यकर्म करतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी चांगले कर्म करून संतस्वरूप कार्याचा आलेख उभा केला असे कारभारी ( दादा ) गिते हे […]

जितेंद्र गोस्वामी यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य गौरवास्पद : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतीपादन

इगतपुरीनामा न्यूज दि. ०८ : दिवंगत जितेंद्र गोस्वामी हे भटक्या विमुक्तांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा शैक्षणिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी आदर्शवत आहे. त्यांचे काम पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेच्या प्रांगणात गोस्वामी यांच्या पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी […]

गोरगरिबांना आरोग्यसेवा देणारा इगतपुरी तालुक्याचा “तुकाराम”

लेखन : लक्ष्मण सोनवणे, पत्रकार अनेकजण नेहमी स्वार्थापोटी काम करीत असले तरी यात समाजसेवेचा हेतू निमित्त मात्र असतो. ह्या धावपळीच्या युगात कुणाला कुणाची मदत करण्यासाठी वेळच नसल्याचे सर्वत्र  पहावयास मिळत असले तरी शेणवड खुर्द येथील तुकाराम वारघडे या अवलीयाने आपल्या वेगवेगळ्या निस्वार्थी सामाजिक कार्याने जिल्हाभरात सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे. गरीब आदिवासी कुटुंबात जन्म झालेल्या […]

अपार मेहनतीतून मुलांना यशस्वी करणाऱ्या घोटीच्या कै. झुणकाबाई तुकाराम नारळे

शब्दांकन :  लक्ष्मण सोनवणे, पत्रकार सुखी संसाराचा गाडा हाकताना अचानक पतीच्या निधनाने खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या महिला आपल्याला पाहिला मिळतात. पतीचा आधार नसूनही अनेक महिलांचा आपल्या मुलांना घडविण्यात मोलाचा वाटा असतो. मेहनत आणि अपार  कष्ट करून अशिक्षित असूनही आपल्या मुला मुलींना यशाचे पंख जोडणाऱ्या घोटी येथील आदिवासी समाजाच्या रणरागिणी कै. झुणकाबाई तुकाराम नारळे वय 96 यांचे वृद्धापकाळाने […]

गोरख बोडके यांच्या सेवाकार्याचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक काम करावे – प्रताप दिघावकर : मानवधन पुरस्काराने गोरख बोडके सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ मानवधर्म जपण्यासाठी सातत्याने निरपेक्ष सेवाकार्याचा दरवळ पसरवण्यासाठी अनेकजण प्रवाहात उतरत असतात. अशाव्यक्तिमत्वांकडून कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता निव्वळ सामाजिक सेवेचे महत्वपूर्ण कार्य अखंड सुरु असते. इगतपुरी तालुक्यातील विविध सेवा क्षेत्रात अग्रगण्य असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांचेही कार्य जनतेच्या हृदयात महत्वाचे स्थान राखून आहे. असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गोरख […]

जनसेवा करण्यासाठी पैशांपेक्षा निस्वार्थी भावना असल्यास जनतेच्या हृदयात स्थान मिळवता येते – गोरख बोडके : “धर्मवीर” चित्रपटाचा इगतपुरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाला लाभ

गोरखभाऊ बोडके युवा मंचाच्या स्तुत्य उपक्रमाचे आमदार खोसकरांकडून कौतुक इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ मानवधर्म आणि सेवा यांच्या अनोख्या कार्याचा दरवळ कधीही संपणारा नाही. त्यांच्या प्रेरणादायी कार्याद्वारे इगतपुरी तालुक्यातही विकासकार्याची मुहूर्तमेढ होणे अत्यावश्यक आहे. यासाठी गोरखभाऊ बोडके युवा फाउंडेशन, महेंद्र केबल नेटवर्क आणि श्याम परदेशी यांच्या संयुक्त विद्यमाने “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” हा स्व. आनंद दिघे […]

error: Content is protected !!