महापुरुषांच्या प्लेक्सची छेडखानी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांशी बोलणार – जिल्हाधिकारी डी. गंगाथरण : स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तृत चर्चा करून दिले निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे छायाचित्र असलेल्या फ्लेक्सबाबत दुष्कृत्य केल्याबद्दल वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात कळवण्यात आले आहे. मात्र अद्याप संबंधित समाजकंटकांवर काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती निर्धास्त झाल्या असून आगामी काळात त्यांच्याकडून विघातक घटना घडण्याची दाट शक्यता आहे. संबंधित गुंड प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांना निर्देश द्यावेत, दुष्कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यासाठी स्वराज्य संघटनेला परवानगी द्यावी अशी मागणी स्वराज्य संघटनेचे निमंत्रक डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे आदींनी केली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांना कार्यकर्त्यांसह भेटून ह्या प्रकरणी डॉ. रुपेश नाठे यांनी विस्तृत चर्चा केली. दिलेल्या निवेदनानुसार वाडीवऱ्हे पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले आहे की, “गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य” अभियानांतर्गत स्वराज्यप्रमुख युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या इगतपुरी तालुका दौऱ्यावेळी अनेक शाखांचे उदघाटन संपन्न झाले. गोंदे दुमाला येथे सायंकाळी जाहीर मेळावा सुद्धा संपन्न झाला. यानिमित्ताने छत्रपती शिवराय यांचे छायाचित्र असलेल्या फ्लेक्सबाबत काही समाजकंटाकांनी दुष्कृत्य केले. यामुळे सर्वांमध्ये संताप पसरला असून आम्ही सर्वांना शांत राहावे यासाठी प्रयत्न केले. संबंधित समाजकंटक गुंड प्रवृत्तीचे असुन त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांकडून कारवाईस विलंब होत असल्याची आम्हाला समजले आहे. भविष्यात हे समाजकंटक वाद निर्माण करतील. ह्यामुळे वाद टाळण्यासाठी पोलिसांना संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना द्याव्या, याविरोधात आक्रोश मोर्चा काढण्याची परवानगी द्यावी असे नमूद आहे. निवेदन देतेवेळी गणेश कदम, स्वराज्य संघटना निमंत्रक डॉ. रुपेश नाठे, ज्ञानेश्वर थोरात, ज्ञानेश्वर चव्हाण,  संतोष थोरात, गणेश नाठे, अजय कश्यप, सुमित कडवे, पियुष भोसले, रोहीदास जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुजय सिंग, अभय कश्यप, संजीत सिंग, प्रतीक धोंगडे, नयन खैरनार, स्वप्नील आहेर, प्रणव देशमुख, प्रमोद पाटील, हर्षल जैन, सचिन नाठे ,गोरख सुरुडे, उमेश सुरुडे, समाधान जाधव, दिपक जाधव, उमेश मोरे, रतन नवले, पोपट जाधव, तुषार डांगे, निखील शिंदे, राहुल नाठे, जीवन नाठे, राहुल मुसळे, करण शिंदे, रितेश शिंगोटे , बंटी सोनवणे, वैभव तांबे, पियुष विश्वकर्मा आणि स्वराज्य संघटनेचे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!