जनसेवा करण्यासाठी पैशांपेक्षा निस्वार्थी भावना असल्यास जनतेच्या हृदयात स्थान मिळवता येते – गोरख बोडके : “धर्मवीर” चित्रपटाचा इगतपुरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाला लाभ

गोरखभाऊ बोडके युवा मंचाच्या स्तुत्य उपक्रमाचे आमदार खोसकरांकडून कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

मानवधर्म आणि सेवा यांच्या अनोख्या कार्याचा दरवळ कधीही संपणारा नाही. त्यांच्या प्रेरणादायी कार्याद्वारे इगतपुरी तालुक्यातही विकासकार्याची मुहूर्तमेढ होणे अत्यावश्यक आहे. यासाठी गोरखभाऊ बोडके युवा फाउंडेशन, महेंद्र केबल नेटवर्क आणि श्याम परदेशी यांच्या संयुक्त विद्यमाने “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” हा स्व. आनंद दिघे यांच्यावरील चित्रपट इगतपुरी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या विविध नेतेमंडळींना दाखवला. गोरख बोडके यांच्या स्वखर्चाने दाखवण्यात आलेल्या ह्या चित्रपटाचा लाभ अनेकांनी घेतला. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पीके ग्रुपचे प्रशांत कडू आदींसह अनेकांनी “धर्मवीर” चित्रपट पाहिला. उपस्थितांनी गोरख बोडके महेंद्र केबल नेटवर्क आणि श्याम परदेशी यांच्या उपक्रमाचे कौतुक करून ह्या अविस्मरणीय चित्रपटाचा लाभ मिळाल्याबद्धल आनंद व्यक्त केला. नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमधील चित्रपटगृहात हा चित्रपट सर्वांनी पाहिला.

जनतेची सेवा करण्यासाठी पैश्यांची आवश्यकता नसून फक्त निःस्वार्थ भावना ठेवली तर प्रत्येक माणसाच्या कुटुंबात अबाधित स्थान मिळवता येते. हा संदेश देण्यासाठी हा चित्रपट दाखवला अशी प्रतिक्रिया जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी यावेळी दिली. “धर्मवीर स्व. आनंद दिघे हे समस्याग्रस्त लोकांच्या समस्या आणि तक्रारी सकाळपासून ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे. प्रसंगी सांगूनही काम नाही होत अस्व म्हटल्यावर त्यांनी हातही उगारलेला आहे. यामुळे पोलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला. ही सगळी पार्श्वभूमीचा आज गोरखभाऊ बोडके युवा फाऊंडेशनतर्फे दाखवलेल्या चित्रपटामुळे ध्यानात आल्याचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, पीके ग्रुपचे प्रशांत कडू, अनिल भोपे, हरिश्चंद्र चव्हाण, महेशनाना शिरोळे, माजी सभापती विठ्ठल लंगडे, संजय खातळे, नगरसेवक संपत डावखर, दीपक गायकवाड, माजी उपसभापती विष्णू चव्हाण, पोपट भागडे, मदन कडू, शाम परदेशी, धनंजय पोरजे, रावसाहेब कातोरे, अनिल टिळे, नंदू भागडे, योगेश आडोळे, आदींसह २०० पेक्षा जास्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!