इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा सदेह वैकुंठगमनाचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवासह इगतपुरी येथे स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांनी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सद्गुरु अनुग्रहाच्या निमित्ताने माघ शुद्ध दशमीला सुरु केलेल्या नाम सप्ताहाचा यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव अर्थात १२५ वे वर्ष आहे. या दोन्ही महोत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. घोटी कृषी […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र म्हणजे वारकऱ्यांचा आत्माच.. हा आत्मा पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेनेच चालतो. वृक्षाचिये पाने हाले त्याचे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण ह्या अभंगावर अनेकांची श्रद्धा आहे. प्रत्येक माणसामध्येही हाच पंढरीचा पांडुरंग वास्तव्य करतो हा भक्तीभाव मनात ठेवून काम करणारा बोराडे परिवार आहे. पांडुरंगी मन रमवून ह्या पांडुरंगाच्या भक्तीरंगात बोराडे परिवार आपला उद्योग व्यवसाय […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व सद्गुरु सच्चिदानंद संत रामदास बाबा या थोर संत महात्म्यांचा २७ वा पुण्यतिथी सोहळा राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील सर्व साधक मायबापांच्या उपस्थितीत पार पडला. या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांसह घोटी नगरीत भव्य पालखी सोहळा पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासोबतच […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील राममंदिर ते कपिलधारा तीर्थ कावनई येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी जनम प्रवचनकार बिपिन नेवासकर, मोहन महाराज कुलकर्णी यांनी गुरुमाऊली यांचा संदेश आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना समजून सांगितला. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगून त्यांनी उपस्थितांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले. ह्या सत्संगानिमित्त सकाळी […]
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी आश्रमशाळेत आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेपासून पायी दिंडी काढत तळेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचलेखैरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘अज्ञानातून तरुन जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरु शकते. साधु-संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणार्या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं सांगताना तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार । मन निरंतर जागविती ॥ असे आपल्याला सांगतात. अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत, सावरत असतात. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रामनवमी व हनुमान जन्मोत्सत्व तथा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले, वै. पोपट महाराज गाजरे यांच्या आशीर्वादाने मंगळवार १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गायक, वादक, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळीनी केले आहे. देवराम महाराज गायकवाड, जगदीश […]
इगतपुरीनामा न्यूज – विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्णमहोत्सव व जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या आशीर्वादाने, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलचे हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाने उद्या मंगळवार ९ एप्रिल पासून अखंड […]
इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहन सोहळ्यानिमित्त मंगळवारी शहरातून श्रींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोटीतील नागरिक आपली दुकाने बंद ठेऊन या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते. संपूर्ण शहर रांगोळीने सजवण्यात येऊन या मिरणुकीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने […]