जितेंद्र गोस्वामी यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य गौरवास्पद : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतीपादन

इगतपुरीनामा न्यूज दि. ०८ : दिवंगत जितेंद्र गोस्वामी हे भटक्या विमुक्तांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा शैक्षणिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी आदर्शवत आहे. त्यांचे काम पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेच्या प्रांगणात गोस्वामी यांच्या पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रफुल्ल मारपकवार हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भटक्या विमुक्त जाती जमातींना एकत्र करून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे हे मोलाचे कार्य गोस्वामी यांनी केले आहे. आचार्य अत्रेंचा वारसा जपणाऱ्या पिढ्यांनी चालवलेले शैक्षणिक कार्य पुढे घेवून जाण्यासाठी त्यांना सहयोग देत गोस्वामी यांच्यासारखी सामाजिक बेटं समाजासमोर आणणे, त्यांचे काम समाजासमोर मांडणे ही माध्यमांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती नेटाने निभावलीच पाहिजे अशी आग्रही भूमिका यावेळी भावे यांनी मांडली.


ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रफुल्ल मारपकवार, इंद्रकुमार जैन, श्रीकांत बेणी यांच्यासह महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघाच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी, संस्थेचे विश्वस्त विशाल भारती, डॉ. सचिन गिरी, प्रणिता गोस्वामी, डॉ. प्राजक्ता गोस्वामी, डॉ. गजानन देसाई यांच्यासह संजीवनी आश्रमशाळेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन श्रीकांत बेणी यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रणिता गोस्वामी यांनी तर आभार प्रदर्शन माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!