इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयात अबाधित स्थान असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम केल्यास समृद्धी लाभेल. त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून साहेबांच्या चिरंतन स्मृती जागरूक ठेवल्याने लोकाभिमुख कार्याचा आलेख निश्चितच वाढेल. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन फक्त लोकांच्या कामाला वाहून घेणाऱ्या लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांना वंदन करतो असे प्रतिपादन शिवसेना, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान धामणगाव खेड गट संस्थापक खंडेराव शिवराम झनकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीप्रसंगी श्री. झनकर बोलत होते. येणाऱ्या काळात मुंढे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोकांसाठी भरीव कार्य करणार असल्याचे श्री. झनकर यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद नाठे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस खंडेराव शिवराम झनकर, हरिभाऊ वाजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. लोकनेते प्रतिष्ठान ग्रुप बारशिंगवे यांच्या वतीने हा जयंती उत्सव साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर चोथवे यांनी तर आभार उपसरपंच पोपट लहामगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, गटप्रमुख साहेबराव झनकर, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव शिवराम झनकर, पत्रकार विनोद नाठे, हेमंत झनकर, सरपंच दिलीप पोटकुळे, साहेबराव बांबळे, अशोक बोराडे, बहिरु केवारे, सोमनाथ घाणे, ग्रामसेवक शरद केकाणे, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विद्यार्थी परिसरातील नागरिक उपस्थित होते.