वेदांत शिर्के याचे तायक्वांदो स्पर्धेत सुयश

इगतपुरीनामा न्यूज – वेदांत रोहिदास शिर्के ह्याने ३२ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर, ज्युनिअर क्योरूगी व ९ वी पुमसे तायक्वांडो स्पर्धा २०२३-२४, वजन गट ४५ ते ४८ किलो मध्ये कांस्य पदक पटकावले. नाशिक क्रीडा संकुलात २७ ते २९ जानेवारी ला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू सहभागी होते. वेदांतने मिळवलेल्या […]

दिलीप पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

इगतपुरीनामा न्यूज – महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दिलीप रोहिदास पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. उपक्रमशील शिक्षक दिलीप पवार हे वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शालेय विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली असून ते उच्चविद्याविभूषित आहेत. महात्मा फुले […]

मिसेस युनिव्हर्स पुरस्कार आणि राष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने बिटुर्लीच्या ग्रामसेविका ज्योती शिंदे-केदारे दिल्लीमध्ये सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – एस. के. युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल आयोजित सिजन २१ मिसेस युनिव्हर्स २०२४ हा किताब इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती कमलेश शिंदे- केदारे यांनी पटकावला आहे. यासह सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार भाजपा नेते संजय तिटोरिया यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. नोएडा […]

राजू देवळेकर यांना भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार शिर्डी येथे प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर यांना मैत्री संस्था मुंबई, मित्र साई अर्पण फाऊंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना शिर्डी येथे माजी खासदार व साई संस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी सिने […]

अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा – जगदगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांना रामजन्मभूमी न्यासाकडून विशेष निमंत्रण

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साधू, संत, महंत महामंडलेश्वर जगदगुरु आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात जगद्गुरू द्वाराचार्य म्हणून वारकरी संप्रदायाचे उपासक संत तुकाराम महाराज अध्यासन पुणे विद्यापीठ माजी प्रमुख व प्राध्यापक लेखक महामंडलेश्वर श्री महंत विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना रामजन्मभूमी न्यास […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इगतपुरी शहराध्यक्षपदी आशाताई थोरात यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट इगतपुरी शहराध्यक्षपदी आशाताई थोरात यांची निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते त्यांना नाशिक येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी आशाताई थोरात यांनी भाजप महिला तालुकाअध्यक्षपद भूषविले आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्या १५ वर्षांपासून समाज कार्य करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेचा मेळावा, गुणगौरव समारंभ, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा गोंदे दुमाला येथे संपन्न झाला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, बागलाणच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक निबंधक शिवाली सांगळे, शिक्षक संघाचे जिल्हा […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकास्तरीय पुरस्कार जाहीर : १३ जानेवारीला गोंदे दुमाला येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – ११० वर्ष परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वात मोठ्या व जुन्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे दरवर्षी इगतपुरी तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. गुणवंत व्यक्ती, शिक्षक आणि शाळा यांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून शनिवारी १३ जानेवारीला गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे होणारा […]

पेहेचान प्रगती फाउंडेशनचे आदर्श सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी – पोलीस निरीक्षक राजू सुर्वे : पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे गुणवंतांना प्रगती सन्मान पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी दुर्गम भागात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या सर्वोत्तम कार्यामुळे सुजाण समाजाची नवीन पिढी निर्माण होत आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी नव्या विचारांची सुसज्ज आणि सुसंस्कृत फौज शिक्षकांच्या योगदानामुळे तयार होत आहे. ह्या गुणवंत शिक्षकांच्या उज्वल कार्याची पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून दरवर्षी दखल घेऊन त्यांना प्रगती सन्मान पुरस्काराचे पाठबळ दिले जाते आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक […]

नागोसली आणि ओंडलीचे नुतन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य केंद्रीय मंत्र्यांकडून सन्मानित : ग्रामविकासासाठी सदैव सोबत ; ना. भारती पवार यांचा शब्द

इगतपुरीनामा न्यूज – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांच्याकडून नागोसली ( वैतरणा ) आणि ओंडली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नागोसली ( वैतरणा ) येथील लोकनियुक्त सरपंच काशिनाथ सक्रू होले, उपसरपंच अशोक दत्तू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, संजय होले, चंदर गिरे, शंकर खातळे आणि ओंडलीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश […]

error: Content is protected !!