इगतपुरीनामा न्यूज – ११० वर्ष परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्वात मोठ्या व जुन्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे दरवर्षी इगतपुरी तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. गुणवंत व्यक्ती, शिक्षक आणि शाळा यांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून शनिवारी १३ जानेवारीला गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे होणारा तालुकास्तरीय मेळावा, दिनदर्शिका प्रकाशन व गुणगौरव सोहळ्यातून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्कार, दिवंगत प्रदेशाध्यक्ष अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि आर. के. खैरनार आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा यावेळी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आले आहे.
महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्कारामध्ये डॉ. श्याम ज्ञानेश्वर बैरागी ( वैद्यकीय ) शैलेश श्यामसुंदर पुरोहित ( पत्रकारिता ), संजय सखाराम आरोटे ( राजकीय ), रमेश रामदास नाठे ( अध्यात्मिक ), बाळू शिवाजी जूंद्रे ( क्रीडा ), पांडुरंग दत्तू जुंद्रे ( क्रीडा ) यांचा समावेश आहे. दिवंगत प्रदेशाध्यक्ष अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी शारदा गोकुळ अहिरे, श्रीकांत कारभारी निकम, अनंत पुंजाराम भदाणे, अनिल उमाजी पन्हाळे, जगन्नाथ गोविंद गांगड, संदीप काशिनाथ देवरे, चंद्रकांत दाजीबा गांगुर्डे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मोगरे, माणिकखांब, त्रिंगलवाडी, शेवगेडांग, चौरेवाडी, काननवाडी, वाघ्याची वाडी ह्या जिल्हा परिषद शाळांना आर. के. खैरनार आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाठी तालुका संघाचे नेते शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन उमेश बबनदास बैरागी, जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता पवार, तालुकाध्यक्ष भिला नानाजी अहिरे, सरचिटणीस विनायक पानसरे, कार्याध्यक्ष दीपक भदाणे, लालू गारे, कार्यालयीन चिटणीस विवेक आहेर, हितेंद्र महाजन, महिला आघाडी तालुकाध्यक्ष माधुरी पाटील, तालुका सरचिटणीस सुशीला चोथवे, आशा पानसरे, सुरेखा गुंजाळ आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.