इगतपुरीनामा न्यूज – श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर यांना मैत्री संस्था मुंबई, मित्र साई अर्पण फाऊंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना शिर्डी येथे माजी खासदार व साई संस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी सिने अभिनेत्री राजेश्री काळे, उद्योजिका आणि समाजसेविका संगीता गुरव, कमांडर नेवहल विंग एनसीसी गोवा स्टेट विश्वनाथ मंडलिक, अभिनेत्री विजया कदम आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रसाद अय्यर, डॉ. विजय कंदेवाड, डॉ.सुनील बोधमवाड, सरिता कुडतरकर, ज्योती काळे, सुमित बोधक, पोपट गवांदे, प्रमोद डेंगळे, अनुजा यादव, प्रवीण भटाटे, नितीन चांदवडकर, रत्नदीप बिर्जे, सागर जाधव, निखिल कर्पे, विजय गडाळे, समाधान खातळे, शरद धोंगडे आदींनी अभिनंदन केले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group