महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेचा मेळावा, गुणगौरव समारंभ, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा गोंदे दुमाला येथे संपन्न झाला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, बागलाणच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक निबंधक शिवाली सांगळे, शिक्षक संघाचे जिल्हा नेते अर्जुन ताकाटे, बागलाण बाजार समितीचे व्हा. चेअरमन युवराज पवार, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद गांगुर्डे, जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे, शिक्षक पतसंस्था चेअरमन उमेश बैरागी,  कार्याध्यक्ष विलास पवार, कोषाध्यक्ष किरण सोनवणे, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक दादा कापडणीस, ललित पगार, संजय भोर, जुनी पेन्शन जिल्हाध्यक्ष प्रदीप पेखळे, सल्लागार धनराज वाणी, बाप्पा महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

शिक्षक संघातर्फे महर्षी पुंजाबाबा गोवर्धने कर्मवीर पुरस्काराने टीव्ही नाईनचे पत्रकार शैलेश पुरोहित, घोटीचे माजी सरपंच संजय आरोटे, धार्मिक कार्या बद्दल रमेश नाठे, वैद्यकीय समाजसेवेबद्दल शाम बैरागी व क्रीडा कार्यासाठी पांडुरंग जुंद्रे व बाळू जुंद्रे यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व. अंबादास वाजे गुणवंत शिक्षक पुरस्काराने शारदा अहिरे, चंद्रकांत गांगुर्डे, अनिल पन्हाळे, अनंत भदाणे, संदीप देवरे, जगन्नाथ गांगड, श्रीकांत निकम आदींचा सन्मान करण्यात आला. शिक्षक नेते स्व. आर. के. खैरनार आदर्श शाळा पुरस्कार देऊन मोगरे, त्रिंगलवाडी, वाघ्याची वाडी, चौरेवाडी, माणिकखांब, काननवाडी, शेवगेडांग या शाळांचा सन्मान झाला. यावेळी येवला तालुकाध्यक्ष शांताराम काकड, बागलाण तालुकाध्यक्ष देवा पवार, पेठ तालुकाध्यक्ष दीपक बागुल, नांदगाव तालुकाध्यक्ष ललित पगार, नाशिक तालुकाध्यक्ष प्रदीप पेखळे, सरचिटणीस सुभाष भदाणे, निफाड सरचिटणीस शशी बोरसे, सिन्नर तालुकाध्यक्ष संजय भोर, सिन्नर पतसंस्था संचालक अंकुश सहाणे आदी पदाधिकारी जिल्हाभरातून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष भिला अहिरे, सरचिटणीस विनायक पानसरे, कार्याध्यक्ष दीपक भदाणे, लालू गारे, चिटणीस विवेक आहेर, संघटक सुनील शिंदे, गणेश नाठे, चिटणीस हितेंद्र महाजन, महिला तालुकाध्यक्ष माधुरी पाटील, सरचिटणीस सुशीला चोथवे, कार्याध्यक्ष आशा पानसरे, सुरेखा गुंजाळ, कोषाध्यक्ष पल्लवी गवांदे आदींनी परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!