इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी दुर्गम भागात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या सर्वोत्तम कार्यामुळे सुजाण समाजाची नवीन पिढी निर्माण होत आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी नव्या विचारांची सुसज्ज आणि सुसंस्कृत फौज शिक्षकांच्या योगदानामुळे तयार होत आहे. ह्या गुणवंत शिक्षकांच्या उज्वल कार्याची पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून दरवर्षी दखल घेऊन त्यांना प्रगती सन्मान पुरस्काराचे पाठबळ दिले जाते आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचा आलेख निर्माण होतो आहे. पेहेचान प्रगती फाउंडेशनचे इगतपुरी तालुक्यातील सामाजिक कार्य आदर्श असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन इगतपुरीचे कर्तव्यकठोर पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केले. मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशन आयोजित प्रगती सन्मान पुरस्कार २०२३ ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी इगतपुरीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून अवैध धंदे उखडून टाकले आहेत. अट्टल गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांनी सामान्य नागरिकांच्या हृदयात भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमी आहे असे मनोगत फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रगती अजमेरा यांनी व्यक्त केले. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना यावेळी सन्मानपत्र देण्यात आले. इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, निवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, फाउंडेशनच्या सदस्या राधा रुंगठा, मंजू केजरीवाल, जयश्री देसाई, गुरुदेव दुरा, विणा ठक्कर, मिना अग्रवाल, मंजु बजाज, विणा मुरारकर, अनुज अजमेरा, शिखा अजमेरा उपस्थित होते.
फाउंडेशनच्या सदस्या लिना कोठारी यांच्या सौजन्याने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. लोकवस्तीत येणाऱ्या अनेक बिबट्याचा बंदोबस्त करून लोकांची भीती घालवण्यासाठी इगतपुरीचे वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या विविध कार्याचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांनी जिद्ध, ध्येय आणि अखंड अभ्यासाच्या बळावर मोठे स्वप्न पूर्ण होतात. यासाठी हे यशस्वी सूत्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकांनी कटीबद्ध व्हावे असे आवाहन आपल्या मनोगतात केले. निवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मनीषा सावळे, शितल पगार, सुजाता बोरसे, मंगला शार्दूल, योगेश कांबळे, वैशाली चौरे, विलास उबाळे, मनीषा वाळवेकर, पंढरीनाथ दळवी, भोरू कुंदे, धम्मज्योती खराटे, पंढरीनाथ फोडसे, वाळीबा पिचड, सचिन गायकवाड, कविता अस्वले, शैलेजा थोरात, सविता गोसावी, विजय भदाणे, वर्षा ससाणे, वृषाली घोरपडे, दत्तू निसरड, गोरख खैरनार ह्या गुणवंत शिक्षक शिक्षिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रगती सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार भास्कर सोनवणे यांनी तर राज्य आदर्श शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांनी आभार मानले.