
इगतपुरीनामा न्यूज – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांच्याकडून नागोसली ( वैतरणा ) आणि ओंडली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नागोसली ( वैतरणा ) येथील लोकनियुक्त सरपंच काशिनाथ सक्रू होले, उपसरपंच अशोक दत्तू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, संजय होले, चंदर गिरे, शंकर खातळे आणि ओंडलीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश खडके यांना ना. भारती पवार यांनी सन्मानित करून शुभेच्छा दिल्या. नागोसली आणि ओंडली गावाच्या विकासासाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही ना. भारती पवार यांनी दिली. दोन्ही ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन ग्रामविकासाठी झटणाऱ्या युवकांच्या हाती सत्ता आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. नागोसलीचे उपसरपंच अशोक शिंदे यांच्या माध्यमातून गावाला पुढे नेणारे नेतृत्व उभे राहिले असल्याचेही ना. पवार म्हणाल्या. केंद्रीय मंत्री ना. भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी चांगले काम करून नावलौकिक वाढवू अशी प्रतिक्रिया उपसरपंच अशोक शिंदे यांनी सर्वांच्या वतीने दिली. ग्रामविकासासाठी सदैव सोबत असून याद्वारे लोकांसाठी चांगले काम उभे राहील. नुतन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातुन गावाच्या विकासासाठी जे जे प्रस्ताव येतील त्यासाठी मदत करून निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री ना. भारती पवार यांनी दिली दिली.