इगतपुरीनामा न्यूज – एस. के. युनिव्हर्स इंडिया इंटरनॅशनल आयोजित सिजन २१ मिसेस युनिव्हर्स २०२४ हा किताब इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती कमलेश शिंदे- केदारे यांनी पटकावला आहे. यासह सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार भाजपा नेते संजय तिटोरिया यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. नोएडा दिल्ली येथे गार्डन विस्ता येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. विविध राज्यातील मिसेस या कॅटेगरीमध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या फेऱ्यांनंतर अंतिम फेरीत ८ स्पर्धकांची निवड झाली. या अटीतटीच्या स्पर्धेत सौ. ज्योती कमलेश शिंदे- केदारे यांनी मिसेस युनिव्हर्स २०२४ हा किताब पटकावला. ह्या स्पर्धेचे आयोजन सोनिया रवटाना, संदीप गोस्वामी व प्रिया प्रजापती यांनी केले होते. या स्पर्धेसाठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सार्थक चौधरी, मुख्य अतिथी म्हणून भाजपा नेते संजय तिटोरिया उपस्थित होते. सौ. ज्योती कमलेश शिंदे यांच्या यशामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी त्यांनी मिसेस महाराष्ट्र फेस ऑफ इयर, मिसेस दुबई इंटरनॅशनल क्लासिक अवॉर्ड असे अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group