
इगतपुरीनामा न्यूज – वेदांत रोहिदास शिर्के ह्याने ३२ वी महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर, ज्युनिअर क्योरूगी व ९ वी पुमसे तायक्वांडो स्पर्धा २०२३-२४, वजन गट ४५ ते ४८ किलो मध्ये कांस्य पदक पटकावले. नाशिक क्रीडा संकुलात २७ ते २९ जानेवारी ला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडू सहभागी होते. वेदांतने मिळवलेल्या यशाबद्दल ग्रँडमास्टर निलेश जालनावाला, वेदांत’स तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष मोहन यादव, वेदांत’स तायक्वांदो अकॅडमीचे सल्लागार राजू देवळेकर, होली फॅमिली हायस्कुलच्या सिस्टर लॉरेटा, प्रशिक्षक रोहिदास शिर्के, सुमित बोधक, प्रमोद डेंगळे, नितीन चांदवडकर, निखिल कर्पे यांनी अभिनंदन केले आहे.