काँग्रेसच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ धांडे यांची नियुक्ती : तालुक्याच्या विविध भागात अभिनंदनाचा वर्षाव

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ रामकृष्ण धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी त्यांना आज नियुक्तीपत्र दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार दशरथ रामकृष्ण धांडे यांची उपाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे. त्यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यात […]

नाशिक जिल्हा गटसचिव संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी देविदास नाठे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – नाशिक जिल्हा गटसचिव संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील भूमिपुत्र देविदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आली आहे. सहकार क्षेत्रातील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ह्या पदावर विराजमान झाल्याने इगतपुरी तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा केडर कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड प्रक्रिया पार पडली. गटसचिव व कर्मचारी […]

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या परीक्षांचा निकाल जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या डिसेंबर २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सीएमए ( CMA ) परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच […]

माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव बुद्रुक सोसायटीची निवडणूक बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, मोहन झोमान, बन्सी पागेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. माजी आमदार मेंगाळ यांचे वर्चस्व असणारी ही सोसायटी असून मोठे कार्यक्षेत्र आणि सभासदांची मोठी संख्या असणारी तालुक्यातील मोठी […]

माजी आमदार शिवराम झोले यांची इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड : जयराम धांडे यांची व्हॉइस चेअरमनपदी लागली वर्णी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ – इगतपुरी तालुका खरेदी विक्रीसाठी संघाच्या चेअरमनपदी इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार शिवराम झोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. व्हॉइस चेअरमनपदावर पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे. बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, मावळते चेअरमन ज्ञानेश्वर […]

टाकेद खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती लगड यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकेद खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती बहिरू लगड यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पध्दतीने झालेल्या निवडीत कुसुम पांडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच सचिन बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या सभेत आरती लगड यांचा एकमेव अर्ज आल्याने […]

समृद्ध फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – घोटी येथील समृद्ध फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान उपक्रम घोटीच्या सरस्वती विद्यालयात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष देविदास पवार, सचिव कोकिळा पवार यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. […]

राज्यातील ३२ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ जाहीर : मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचा अनोखा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२३’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण […]

कोरपगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल बाळू कडलग यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी तालुक्यातील कोरपगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल बाळू कडलग यांची निवड झाली आहे. उपसरपंच निवडीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुनीता नारायण पवार, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम वायाळ, गजीराम झुगरे, स्वाती डहाळे आदी उपस्थित होते. अनिल कडलग यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा होताच ग्रामस्थांनी फटाके व गुलालाची उधळण करून […]

खरेदी विक्री संघ संचालकपदाच्या माध्यमातून विकासासाठी कटिबद्ध – आशा देविदास देवगिरे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी आशा देविदास देवगिरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सौ. आशा देवगिरे या इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगाचे लोकनियुक्त सरपंच देविदास देवगिरे यांच्या सौभाग्यवती आहेत. पिंपळगाव घाडगा आणि परिसराच्या विकासात मोलाचे कार्य करणारे विद्यमान सरपंच देविदास देवगिरे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळालेले आहे. यापुढील काळात […]

error: Content is protected !!