इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ रामकृष्ण धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी त्यांना आज नियुक्तीपत्र दिले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार दशरथ रामकृष्ण धांडे यांची उपाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे. त्यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यात स्वागत करण्यात आले असून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव सुरु आहे.
काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असणारे दशरथ धांडे यांच्याकडे मजबूत संघटन असून इगतपुरी तालुक्यातील
विविध क्षेत्रात दांडगा संपर्क आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन चैतन्य संचारले आहे. निवडीबद्दल विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी दशरथ धांडे म्हणाले की, काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केल्याने माझी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून पक्षासाठी मजबूत संघटन उभे करणार आहे.