कोरपगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल बाळू कडलग यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी तालुक्यातील कोरपगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिल बाळू कडलग यांची निवड झाली आहे. उपसरपंच निवडीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुनीता नारायण पवार, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम वायाळ, गजीराम झुगरे, स्वाती डहाळे आदी उपस्थित होते. अनिल कडलग यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा होताच ग्रामस्थांनी फटाके व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. त्यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.

यावेळी कारभारी गायकवाड, रवींद्र दोंदे, रघुनाथ डहाळे, लक्ष्मण नाडेकर, साहेबराव कोकणे, संतोष कोकणे, परसराम सहाणे, त्र्यंबक डहाळे,अशोक पवार, दिलीप दोंदे, पोलीस पाटील भारत गायकवाड, भाऊराव दोंदे, मैफत डहाळे, अजित डोखे, बाळु गोडसे, नवनाथ नाडेकर, दशरथ डहाळे, विष्णू गायकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वास दाखवून मला उपसरपंच पदावर काम करण्याची संधी दिली. मी विकासकामातुन गावाच्या विकासाचा नवा आलेख उभा करून सार्थ ठरवेन असे नवनियुक्त उपसरपंच अनिल बाळु कडलग यांनी यावेळी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!