इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, मोहन झोमान, बन्सी पागेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. माजी आमदार मेंगाळ यांचे वर्चस्व असणारी ही सोसायटी असून मोठे कार्यक्षेत्र आणि सभासदांची मोठी संख्या असणारी तालुक्यातील मोठी सोसायटी आहे.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये रखमाबाई दगडू मेंगाळ, मनोहर चंदर जाधव, बन्सी चंदर पागेरे, भाऊसाहेब रामदास गायकर, नारायण देवराम गायकर, नाना त्र्यंबक गायकर, रामदास बंडू गायकर, विठोबा संतू संधान, दादा भीमा शिरसाठ, ज्ञानेश्वर वामन पागेरे, कमलाबाई शिवराम पाळदे, कौसाबाई दशरथ मुसळे, निवृत्ती करवर, तज्ज्ञ संचालक रोहिदास काशिनाथ पागेरे, बँक संचालक मंगेश यशवंत पगारे यांचा समावेश आहे. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पिंपळगाव घाडगाचे लोकनियुक्त सरपंच देविदास देवगिरे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त संचालकांचे अभिनंदन केले आहे.