इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – नाशिक जिल्हा गटसचिव संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील भूमिपुत्र देविदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आली आहे. सहकार क्षेत्रातील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ह्या पदावर विराजमान झाल्याने इगतपुरी तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा केडर कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड प्रक्रिया पार पडली. गटसचिव व कर्मचारी संघटना नाशिक जिल्हाध्यक्षपदी देविदास नाठे यांच्या बिनविरोध निवडीने इगतपुरी तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व सचिवांनी माझ्यावर विश्वास टाकुन जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. चांगल्या कामांच्या माध्यमातून हा विश्वास सार्थ ठरवून सचिवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील.
- देविदास नाठे, नूतन जिल्हाध्यक्ष
मविप्रचे संचालक काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, बेलगाव कुऱ्हे सोसायटीचे चेअरमन मधुकर धोंगडे, व्हॉइस चेअरमन मुरलीधर धोंगडे, जेष्ठ संचालक शिवराम धोंगडे, विष्णूपंत धोंगडे, संपत धोंगडे, रमेश गव्हाणे, राजाराम धोंगडे, जिल्हा बँक अस्वली शाखेचे मॅनेजर देवरे, टकले यांनी नूतन जिल्हाध्यक्ष देविदास नाठे यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व सचिवांकडुन शुभेच्छा देण्यात आल्या. सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, माजी जिल्हाध्यक्ष दिनेश मोरकर, सटाण्याचे अनिल खरे, सिन्नरचे किरण गोसावी, नाशिकचे विलास पेखळे, मालेगावचे मुन्ना बोरसे, बाळासाहेब खोकले, येवल्याचे नारायण गोरे, देवळ्याचे दिपक पवार, चंद्रकांत आवटे, सुनील माळी, राजेंद्र गोसावी, निफाडचे नरहरी कोटकर, राजू कासव, जाधव चांदवडचे जाधव, नंदकिशोर पवार, दिंडोरीचे गवळी, कळवणचे शिवाजी जाधव आदींसह सचिव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.