इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ – इगतपुरी तालुका खरेदी विक्रीसाठी संघाच्या चेअरमनपदी इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार शिवराम झोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. व्हॉइस चेअरमनपदावर पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे यांचीही बिनविरोध वर्णी लागली आहे. बिनविरोध निवडीसाठी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, मावळते चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी विशेष प्रयत्न केले. दोघांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. निवडीच्या बैठकीवेळी संचालक ज्ञानेश्वर लहाने, सुनीता संदीप गुळवे, आशाबाई देविदास देवगिरे, सुनील जाधव, बेलगाव तऱ्हाळेचे चेअरमन समाधान वारुंगसे, कऱ्होळेचे माजी सरपंच पांडुरंग खातळे, अरुण गायकर, प्रकाश गव्हाणे, देविदास जाधव, संजय जाधव, ॲड. अनिल रघुनाथ तोकडे, रमेश धांडे, देवराम म्हसणे, मोहन भोर, भरत कातोरे उपस्थित होते. चेअरमनपदाच्या माध्यमातून विकासात्मक कामांना प्राधान्य देऊन लोकांचा विश्वास सार्थ असे मनोगत शिवराम झोले यांनी व्यक्त केले. सर्वांच्या साहाय्याने आगामी काळात चांगले काम करू असे जयराम धांडे यांनी सांगितले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group