
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी आशा देविदास देवगिरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सौ. आशा देवगिरे या इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगाचे लोकनियुक्त सरपंच देविदास देवगिरे यांच्या सौभाग्यवती आहेत. पिंपळगाव घाडगा आणि परिसराच्या विकासात मोलाचे कार्य करणारे विद्यमान सरपंच देविदास देवगिरे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळालेले आहे. यापुढील काळात खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पतींच्या सहकार्याने भरीव काम करणार असल्याचे सौ. आशा देवगिरे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, इंदिरा काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे, विद्यमान चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जेष्ठ नेते रतन जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात भरीव काम करील असे सौ. आशा देवगिरे म्हणाल्या. सौ. देवगिरे यांच्या निवडीबद्दल देवगिरे दांपत्याचे तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.