राज्यातील ३२ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ जाहीर : मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचा अनोखा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२३’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर विजेत्या उपक्रमांची निवड केली गेली आहे. महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित राज्यात दुसऱ्यांदा असा अनोखा उपक्रम शिक्षक ध्येयतर्फे राबविण्यात आला आहे. राज्यातील ४९ महिलांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असून ३२ महिलांना या ठिकाणी ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल राज्यातील महिलांचे आभार आणि हार्दिक अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक डॉ. बाबासाहेब गणपत बडे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांनी पारदर्शक पद्धतीने निकाल जाहीर केला. शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या ( सामंत ) सावंत, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, सुधाकर जाधव, डॉ. माधव गावीत, अशरफ आंजर्लेकर, मंजू वणवे, मिलिंद दीक्षित, कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार, प्रदीप बेलदार, पुरुषोत्तम पटेल, विजय अहिरे, डी. जी. पाटील, सतीश बनसोडे, राजेंद्र लोखंडे, एस. जी. कांबळे पाटोडेकर, अर्चना भरकाडे, प्रवीण घाडगे, आल्मेडा रॉबर्ट, धन्यकुमार तारळकर, कैलास बडगुजर, आणि शिक्षक ध्येयच्या संपूर्ण राज्यस्तरीय संपादकीय मंडळाने विजेत्यांचे अभिनंदन केले.

राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये सरला शामराव कामे ( छत्रपती संभाजीनगर ), अश्विनी अशोककुमार बुंधे (अमरावती ), मनीषा किशोर पाटील ( जळगाव ), नीलिमा दीपक पुनसे ( वर्धा ), अनिता हिम्मतराव बेडसे ( नाशिक ), दर्शना जयेश मुकणे ( पालघर ), प्रमोदिनी विठ्ठलराव राऊत ( अमरावती ), अंजुम तारीश अत्तार (सांगली ), अश्विनी बोरुडे ( मुंबई ), वर्षा इंद्रजित हडपसरकर ( पुणे ), शैला दगडू वाघ ( अहमदनगर ), अल्फिया मोहंम्मद बागवान ( कोल्हापूर ), वैशाली महेश सणस ( पुणे ), सीमा बालाजीराव गबाळे ( यवतमाळ ), शुभांगी तानाजी कुंभार (सातारा ),.मोहिनी पंडित बागुल ( ठाणे ), ज्योती गणपतराव गादगे ( लातूर ), शितल शेखर चौधरी ( मुंबई ), कोमलकांता बन्सोड ( गोंदिया ), मानसी विश्वास सागर ( नाशिक ), डॉ. निर्मला रखमाजी काकडे ( अहमदनगर ), डॉ. मनीषा आनंद पाटील ( सातारा ), रजनी राजेंद्र घोडके ( कोल्हापूर ), कामाक्षी कल्याणराव पवार ( लातूर ), वर्षा सुरेशराव पवार ( नंदुरबार ), संगीता तुळशीराम पवार ( मुंबई ), शहनाज सलीम अत्तार ( सोलापूर ), प्रज्ञा सुनील म्हात्रे ( ठाणे ), ललिता मुरलीधर जावडेकर ( पुणे ), डॉ. स्वाती सिंह ( भिवंडी ), डॉ. समिधा गोरे ( ठाणे ), यशोदा चंद्रकांत घोडे  ( ठाणे ) यांचा समावेश आहे.

Similar Posts

error: Content is protected !!