दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या परीक्षांचा निकाल जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडियातर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या डिसेंबर २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सीएमए ( CMA ) परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. सीएमए ( कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ) या कोर्सच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या “दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ( ICMAI )” या संस्थेच्या वतीने केले जाते. १२ वी नंतरच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम फाउंडेशन ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढील इंटरमिजीएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. इंटरमिजीएट परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी फायनलसाठी पात्र होतात.

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे डिसेंबर सत्राची परीक्षा जानेवारी मध्ये अखिल भारतीय स्तरावर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. नाशिक चॅप्टरमधून इंटरमिजीएट परीक्षेसाठी ४०५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३ विद्यार्थी इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम क्रमांक फराज शेख, द्वितीय मंगेश साबळे, तृतीय अभिषेक राऊत यांनी मिळवला. सीएमए फायनलच्या परीक्षेला १४२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अनिल खैरनार, पुजा बोथरा, प्रणित जैन, अंकुर भूषण, चेतन शिंदे हे ५ जण उत्तीर्ण झाले. नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए भुषण उत्तम पागेरे, स्टुडंट डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीएमए अरिफखान मन्सूरी,
प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीएमए कैलास शिंदे, मीडिया आणि पब्लिक रिलेशनशिप कमिटीचे अध्यक्ष सीएमए निखिल पवार, उपाध्यक्ष सीएमए दिपक जगताप, सचिव सीएमए अर्पिता फेगडे, खजिनदार सीएमए मयुर निकम, सीएमए स्वप्नील खराडे, सीएमए दिपक जोशी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ह्या कोर्सच्या अधिक माहितीसाठी ०२५३- २५००१५०, २५०९९८९ ह्यावर संपर्क साधता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!