वन अधिकाऱ्यांसोबत तस्करांची झटापट झाल्याने हवेत गोळीबार ; बिबट्याच्या अवयवाची १७ लाखांत तस्करी करणारे ४ जण अटक : इगतपुरी त्र्यंबकेश्वर वन विभागाच्या संयुक्त कारवाईला यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने मोठी कामगिरी केली असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आज झालेल्या कारवाईमध्ये इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी मोठी कामगिरी केली. वन अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधला. त्या व्यक्तींनी ह्या व्यवहातसाठी 17 लाख रुपयांमध्ये […]

त्र्यंबकेश्वर ते नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे लागली वाट : दरवर्षी लाखोंचा निधी जातो तरी कुठे ?

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात १५० कोटी रुपये खर्चून पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर हा राज्य महामार्ग तयार करण्यात आला. देशातील पहिला ग्रीन हायवे म्हणून त्याची ख्याती असली तरी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर टप्प्या टप्प्याने खड्डे पडलेले असल्याने खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्याची दुरवस्था […]

दुखणे आरक्षणाचे – “ह्या” जिल्हा परिषद गटाचे बदलणार आरक्षण : जिल्ह्यातील अन्य गटांवरील आरक्षण सुद्धा बदलण्याची शक्यता वाढली

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा, न्यूज, दि. ३ महत्वाचे : ह्या बातमीची कॉपी करून अन्य माध्यमात प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मागील आठवड्यात आरक्षण काढण्यात आले. ह्यामुळे कुठे धुमारे अन कुठे फवारे असे वातावरण जिल्हाभर निर्माण झाले. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सुरु करून जनसंपर्क वाढवला. आरक्षणामुळे अनेक बड्या […]

इगतपुरी त्र्यंबकेश्वरमधील पर्यटनबंदीमुळे आदिवासी आणि स्थानिकांच्या रोजगारावर दुष्परिणाम : तातडीने पर्यटनबंदी मागे घेण्याची माजी आमदार निर्मला गावित यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाळी हंगामामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांची प्रचंड गर्दी मुंबई व नाशिक शहरातुन फार मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यात शनिवारी व रविवारी गर्दी होत असते. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र पर्यटकांना मज्जाव केल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. यासह पोलीस […]

इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पर्यटनस्थळे आणि गडकिल्ल्यांवर पर्यटकांना वन विभागाकडून बंदी : नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ सगळीकडे सध्या अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा, इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटन स्थळी […]

आगामी निवडणूकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आढावा बैठक : रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी केले आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न झाली. आगामी  जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने हरसूल गट व गणावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भोये, […]

सासूच्या पोटात कात्री खुपसून जावयाने केला खून : पत्नीसह मुलीला केले गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ पत्नी नांदायला येत नाही या कारणाची कुरापत काढुन जावयाने सासुच्या पोटात कात्री खुपसुन ठार केले तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीलाही विळ्याचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक येथे घडली आहे. झारवड येथील जोशी कंपनी जवळ राहणाऱ्या सासुच्या पोटात जावयाने धारदार कात्री खुपसुन ठार मारल्याची घटना घडली […]

संकटांच्या ढिगाऱ्यावर उभे राहून निर्विवाद कर्तृत्व मिळवणारा ८० वर्षाचा तरुण वाढोलीच्या चेअरमनपदी स्थानापन्न

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा ग्रामीण लोकजीवनात वर्षानुवर्षे अनेक दाहक प्रश्नाशी झुंजणारी अनेक माणसं आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्वलंत परिणामांचा अनुभव असणारेही अनेक आहेत. मात्र आयुष्यभर लढा देऊन ह्या प्रश्नांवर उत्तरं शोधणारी व्यक्तिमत्व दुर्मिळ आहेत. याचप्रकारे आयुष्याची ८० वर्ष अनेकानेक आघाड्यांवर लढा देऊन यशाचे सुखद स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात साकार केले […]

वाढोली सोसायटीच्या चेअरमनपदी विश्राम महाले ; व्हॉइस चेअरमनपदी गणपत महाले बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाढोली सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विश्राम भाऊराव महाले तर व्हॉइस चेअरमनपदी गणपत महाले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी चेअरमन रतन महाले, माजी सरपंच रामभाऊ महाले, यशवंत महाले, कचरु महाले, शंकर ढगे, निवृत्ती महाले, प्रेमराज महाले, कारभारी महाले, पंढरी महाले, तुकाराम महाले, सोपान महाले, दशरथ महाले, […]

वाढोली सोसायटीत प्रस्थापितांना नम्रता पॅनलकडून दणका : विरोधी शेतकरी विकास पॅनलच्या झोळीत फक्त भोपळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये परिवर्तन घडले आहे. प्रस्थापितांना दणका देऊन विविध आघाड्यांवर एकजुटीने काम करत  नम्रता पॅनलने चांगलीच बाजी मारली आहे. विरोधी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व मनोहर महाले, पाराजी महाले, हिरामण भगत आदींनी केले. मात्र सर्वांच्या पदरात पराभव पडला. शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये नम्रता पॅनेलचे १२ […]

error: Content is protected !!