इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून वाडीवऱ्हे गोंदे पर्यंत वाहतुक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते चार तास लागत आहेत. लहान मोठी वाहने, मोटारसायकली चांगलीच अडकून बसत असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणांनी अपघातही […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर गेल्या अनेक महिन्यापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्यांवरून मागील महिन्यात विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहावयास मिळाली होती, पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र इगतपुरी तालुक्यातील सिन्नर चौफुली, बोरटेंभे फाटा, पिंपरी फाटा येथे अजूनही खड्यांचे साम्राज्य असून वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – मुंबई आग्रा महामार्गांवरील घोटी येथील सिन्नरफाटा येथे आज सायंकाळच्या सुमाराला एका ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवरील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान उड्डाणपूल ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. 16 रहदारी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या त्र्यंबक आंबोली रस्त्याची बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पूर्ण वाट लागली आहे. साधे खड्डे बुजवण्याची देखील तसदी घेत नसल्याने निष्काळजीपणाचा अक्षरशः कळस झाला आहे. संबंधित विभागाला जाग कधी येणार असा प्रश्न येथील वाहनधारक यांना पडला आहे. नागरिकांचा जीव जाण्याची हा विभाग वाट पाहत आहे काय? […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 7 मुंबई आग्रा महामार्ग आणि अपघात हे समीकरण आता लोकांना माहित झाले आहे. आज महामार्गावर 2 अपघात झाले. पहिला अपघात कसारा घाटात झाला. मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मागून येणाऱ्या आयशरच्याखाली राजेश मारू रा. इगतपुरी हे जागीच ठार तर कपिल मुतडक हे गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 4 मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. अचानक जनावरे आणि कुत्रे रस्त्यावर आल्यामुळे सुद्धा अपघात घडत आहेत. यामुळे चिंतेत भर पडली असून आज दुपारी वाडीवऱ्हे कडून गोंदे दुमाला गावाकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अपघात झाला. व्हीटीसी फाट्याजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात झाला. यामध्ये ८ महिन्याची गरोदर महिला, बालक आणि तिचा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 31 गेल्या आठवड्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी झाल्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबरपासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. दैनदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत […]
छगन भुजबळ यांनी महामार्ग अधिकाऱ्यांसोबत केली महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी : लोकांच्या संयमाचा अंत पाहू नये – छगन भुजबळ इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 18 मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे, गोंदे, रायगडनगर ( चिमनबारी ) आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या वाढला आहे. अचानक ही जनावरे रस्त्यावरून इकडे तिकडे पळत असल्याने वाहनधारकांचा अंदाज चुकतो. यामुळे छोटे मोठे अपघात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. ही मोकाट जनावरे धिम्मपणे महामार्गावर बसून राहत असल्याने वाहतुकीला सुद्धा खोळंबा होत आहे. नियमित प्रवास […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 10 मुंबई आग्रा महामार्गावर खड्ड्यांची समस्या लोकांच्या जीवावर बेतत आहे. इगतपुरी येथील हॉटेल ग्रीनलँडजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात मोटारसायकल घसरल्याने अपघात झाला. यामध्ये 2 युवती जखमी झाल्या आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. MH 15 […]