सुपलीची मेट व गंगाव्दारच्या लोकांचा स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावणार – आमदार हिरामण खोसकर : अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची केली पाहणी

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. 9

प्रदक्षिणा मार्गातील ब्रह्मगिरीवर अवैध उत्खनन झाल्यामुळे धोकादायक बनलेल्या सुपलीची मेट व गंगाव्दार येथे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांचे व रस्त्याची प्रचंड नुकसान झाले. याबाबत दखल इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली. धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रम्हगिरीच्या उत्खननामुळे पावसाळ्यात दगडे व दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात सुपलीची मेट व गंगाव्दार येथे निर्माण झालेल्या धोक्याबाबत आमदार खोसकर यांनी चिंता व्यक्त केली. सुपलीची मेट  व गंगाव्दार येथील नागरीकांचे मुलभूत प्रश्न समजुन घेत येथील ३०० लोकांना प्रधानमंत्री आवास योजना मार्फत घरकुल मंजुर करणार असल्याचे ते म्हणाले. सापगाव नजीक जागा उपलब्ध करुन देऊन येथील लोकांचे पुनर्वसन करणार असल्याचेही आमदार खोसकर यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वीच झालेल्या पावसाने डोंगर वस्ती असलेल्या सुपलीमेट, गंगाव्दार परिसरात दरड कोसळुन घरांची पडझड झाली होती. ह्या ठिकाणी माळीण परिस्थिती सारखा धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेवून आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. पुढील काळात उपाययोजनांबाबत तज्ञ लोकांशी भेटी घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. ब्रम्हगिरीच्या डोंगर कडेला ग्रुटींग सह अन्य उपाययोजनां करावी अशी सकारात्मक चर्चा होऊन प्रशासनास तात्काळ सुचना देण्यात आल्या. सुपलीची मेट भागात दरड कोसळणे सारखा प्रसंग येवू नये यासाठी तेथील लोक वस्तीचे स्थलांतर करावे अशा सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. सुपलीचे मेट येथील युवक झोले, बदादे, गमे यांनी मागील वेळी आमदार खोसकर यांनी वनविभागाकडुन पुनर्वसनासाठी जागा मिळवून देऊ असे सांगितल्याची आठवण करून दिली. त्यानुसार आमदार खोसकर यांनी दिलेला शब्द खरा केल्याने समाधान व्यक्त करत आभार मानले.

सुपलीची मेट व गंगाव्दार येथे 2 दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे दगडे व दरड कोसळण्यांचा घटना घडत असल्याने शासनाकडून येथील लोकांना घरकुल मंजुर होणेकामी व वनविभागाने दिलेल्या जागेवर पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार आहे.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!