त्र्यंबकेश्वर तालुक्यात सीईओ आशिमा मित्तल यांचा भेटी आणि मार्गदर्शन दौरा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात ओझरखेड, सादडपणा ( मुलवड ) हिवाळी ( बेरवळ ) हरसूल येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. ओझरखेड येथील ५ टक्के पेसा अबंध निधी नमुने, सर्व योजनांच्या ऑनलाईन कामकाजाचा आढावा, १५ वा वित्त आयोग, घरपट्टी आणि पाणीपट्टी, जीपी, महा ई ग्राम, नरेगा या योजनांचा आढावा घेण्यात आला. पशुसंवर्धन,प्राथमिक उपकेंद्र, अंगणवाडी कार्यालय, प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत येथे भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सादडपाणा येथील ग्रामकोश समितीच्या पेसा ग्रामसभेत मार्गदर्शन केलें. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील राबवलेले शैक्षणिक उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम व गुणवत्तेबाबत कौतुक केले. हरसूल येथे उमेद कौशल्य विकास बाबत बचत गटातील महिलांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी श्रीकिसन खातळे, अधिकारी, ग्रामसेवक आदी हजर होते. 

Similar Posts

error: Content is protected !!