इगतपुरीनामा न्यूज, दि. 15
गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी, नाशिक, ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर दोन संशयित मोतीराम महादू खोसकर वय ३५, रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर ), सुभाष रामदास गुंबाडे वय ३५, रा. पाटे, ता. पेठ यांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्या म्होरक्याचा शोध वनविभागाकडून सुरु आहे. मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे वनपरिक्षेत्र आधिकारी केतन बिरारीस, वनपरिमंडळ आधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, रुपेश दुसाने, वनरक्षक विठ्ठल गावंडे, गौरव गांगुर्डे, फैजअली सैय्यद, मझहर शेख, गोरख बागुल, कैलास पोटींदे, चिंतामण गाडर, शरद थोरात, राहुल घाटेसाव, उत्तम पाटील, विजय पाटील, प्रकाश साळुंखे, वाहनचालक नाना जगताप, मुज्जू शेख, सुनील खानझोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास ननाशीच्या वनपरिक्षेत्र आधिकारी सविता पाटील करीत आहे.