
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव भागातील एक अविवाहित गरोदर मुलगी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. त्या मुलीने गरोदर असल्याचा खुलासा केला. म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील बळजबरी करून गरोदर करणाऱ्या युवकाचे नाव घेतले. याबाबत खात्री करण्यासाठी घोटी पोलिसांनी पोलीस पाटलाच्या मार्फत संबंधित तरुणाला संपर्क साधला. यामुळे घाबरलेल्या ह्या तरुणाने आपले जीवन संपवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी ह्या तरुणाने गुन्हा दाखल होण्याच्या आधीच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश संजय बांगारे रा. वावी हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.माझा काही संबंध नसून DNA तपासणी केल्यास सगळे स्पष्ट होईल असे त्याने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. घोटी पोलीसांनी याबाबत नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.