भाजपाने वादग्रस्त लोकांना आवर घालून त्र्यंबकेश्वरची शांतता, सामाजिक सलोखा अबाधित राखावा : आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – पोलिसांनी स्थानिक नागरिक, शांतता समिती यांची बैठक घेऊन त्र्यंबकेश्वरचे प्रकरण शांततेने मिटवले असतांनाच पुण्यातील हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे व त्यांचे सहकारी यांनी मंदिर प्रवेशद्वारावर आंदोलन केले. तुषार भोसले यांच्या आक्षेपार्ह विधानाने शांतता भंग, सामाजिक तेढ आणि श्रद्धेच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडला आहे. भाजपा आमदार नितेश राणे, अशोक उईके यांनी पत्रकार परिषद […]

त्र्यंबक तालुक्यातील विविध दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश : त्र्यंबक तालुक्यातील राजकारणाला मिळणार कलाटणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी […]

शिरसाठे येथील जमिनीचा निकाल लावून दिल्याच्या मोबदल्यात १ लाख ५० हजाराची लाच भोवली : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाचा चालक एसीबीच्या जाळ्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथे गट क्रमांक १७६ ह्या जमीनीबाबत तत्कालीन प्रांतधिकारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यांचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून दिला. त्र्यंबकेश्वर तहसीलचा वाहनचालक अनिल बाबुराव आगीवले याने त्याच्या मोबदल्यात २ लाखांची लाच मागितली होती. त्याला याआधी ५० हजार दिले होते. उर्वरित दीड लाख घेताना अनिल बाबुराव आगीवले याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक […]

धर्मांतरित आदिवासींच्या शासकीय सवलती बंद करा ; चिंचवड धर्म संसदेत साधू महंतांचा एकमताने ठराव : हभप काशिनाथ महाराज यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त शाही मिरवणूक सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – देशातील सर्व धर्मांतरित आदिवासींच्या शासकीय योजना व सवलती बंद कराव्या असा ठराव चिंचवड खोरीपाडा येथील धर्मसभेत एकमताने मांडण्यात आला. हभप काशिनाथ महाराज भोये ओझरखेड धाम यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतनानिमित्त 1008  महांडलेश्वर रघुनाथ देवबाप्पा फरशीवाले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड खोरीपाडा येथे धर्म संसद व शाही मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध […]

आदिवासी भागातील चिंचवड येथे धर्म संसदेचे आयोजन : महामंडलेश्वर काशिनाथ महाराजांच्या अभिष्टचिंतनानिमित्त येणार राज्यातील प्रमुख वैष्णव साधू संत

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे महामंडलेश्वर काशिनाथ महाराज यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रथमच आदिवासी परिसरात धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. 1008 महामंडलेश्वर रघुनाथ महाराज देवबाप्पा, हभप संदीपान महाराज अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होत आहे. कैलास मठाचे संविधानंद सरस्वती महाराज, देवाची […]

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सीईओ आशिमा मित्तल यांचा भेटी आणि मार्गदर्शन दौरा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात ओझरखेड, सादडपणा ( मुलवड ) हिवाळी ( बेरवळ ) हरसूल येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. ओझरखेड येथील ५ टक्के पेसा अबंध निधी नमुने, सर्व योजनांच्या ऑनलाईन कामकाजाचा आढावा, १५ वा वित्त आयोग, घरपट्टी आणि […]

गरोदर मुलीने नाव घेतले ; बदनामीच्या भीतीने युवकाने घेतला गळफास : वावी हर्षचा मुलगा तर मुंढेगाव भागातील मुलगी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव भागातील एक अविवाहित गरोदर मुलगी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. त्या मुलीने गरोदर असल्याचा खुलासा केला. म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील बळजबरी करून गरोदर करणाऱ्या युवकाचे नाव घेतले. याबाबत खात्री करण्यासाठी घोटी पोलिसांनी पोलीस पाटलाच्या मार्फत संबंधित तरुणाला संपर्क साधला. यामुळे घाबरलेल्या ह्या तरुणाने आपले जीवन संपवून […]

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रोजगार हमी कामकाज गतिमान : १८ हजार ९३४ मजुरांच्या हाताला मिळणार काम

सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामांना मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी तालुक्यातील सतरा गावांत कामांचे भूमिपूजन मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अर्जुन गुंडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तालुक्यात ६५  कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत एकाच वेळेस सुरू करण्यात आली हवं. […]

त्र्यंबक आंबोली रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्याने वाहनधारक त्रस्त : खड्डे बुजवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. 16 रहदारी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या त्र्यंबक आंबोली रस्त्याची बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पूर्ण वाट लागली आहे. साधे खड्डे बुजवण्याची देखील तसदी घेत नसल्याने निष्काळजीपणाचा अक्षरशः कळस झाला आहे. संबंधित विभागाला जाग कधी येणार असा प्रश्न येथील वाहनधारक यांना पडला आहे. नागरिकांचा जीव जाण्याची हा विभाग वाट पाहत आहे काय? […]

अंजनेरी येथील स्टंटबाज शपथविधी सोहळ्याला ६ ग्रामपंचायत सदस्यांचा तीव्र विरोध ; ग्रामस्थांचीही नाराजी : परस्पर एकतर्फी कामकाजामुळे अंजनेरीत २ गटाची निर्मिती

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. 13 ग्रामपंचायत कायद्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शपथ घेण्याची कोणतीही तरतूद नाही. अशा स्थितीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह उपसरपंच आणि काही सदस्यांनी सोमवारी शपथविधी सोहळ्याचे आयोजन केले आहे. निव्वळ स्टंटबाजीसाठी हा कार्यक्रम होत असून ग्रामपंचायतीच्या निम्म्या सदस्यांना विश्वासात न घेता लोकांच्या कररूपी पैशांचा दुरुपयोग करण्यात येत आहे. ह्या स्टंटबाजीला […]

error: Content is protected !!