इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे महामंडलेश्वर काशिनाथ महाराज यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रथमच आदिवासी परिसरात धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. 1008 महामंडलेश्वर रघुनाथ महाराज देवबाप्पा, हभप संदीपान महाराज अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होत आहे. कैलास मठाचे संविधानंद सरस्वती महाराज, देवाची आळंदी येथील कुरेकर बाबा, लक्ष्मीनारायण मंदिर बडा पंचवटी, रामस्नेही दास गुरु नारायण दास ईश्वर दास, राम किशोर शास्त्री महाराज दिगंबर अनि आखाडा, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, अमृत स्वामी बीड, भक्ती दास महाराज पंचमुखी हनुमान मंदिर नाशिक, फलाहारी महाराज कपिलधारा तीर्थ, रमण गिरी महाराज भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासक, महंत दिव्यानंद गिरी महाराज अन्नपूर्णा आश्रम त्र्यंबकेश्वर, महंत सच्चिदानंद महाराज देवबाप्पा आश्रम मंडला, खडेश्वर महाराज येवला आदी प्रमुख वैष्णव साधू महंतांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. धर्म संसद होण्याअगोदर प्रमुख साधू संतांची भव्य मिरवणूक सोहळा होईल. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे यांच्या नामसंकीर्तनाने समारोप होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समिती व चिंचवड ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group