
इगतपुरीनामा न्यूज, दि. 1
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्त्वपूर्ण दलपतपुर ग्रामपंचायतीमध्ये माजी उपसभापती रविंद्र भोये यांच्या नेतृत्वाखाली खंदे समर्थक कु. अंकुश कामडी यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली. चिखलपाडा, हट्टीपाडा, दलपतपुर येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन उपसरपंच निवडीचा जल्लोष साजरा केला. यावेळी विरोधकांकडे फक्त दोन ग्रामपंचायत सदस्य असल्याने उपसरपंच पदासाठी त्यांनी नामनिर्देशन ही भरले नाही, या बिनविरोध निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोरसे, विलास जाधव, रेणुका भोये, तुळसा भोये, लता महाले, कांचन दरोडे यांनी एकजुटीने एकत्र राहुन माजी उपसभापती रविंद्रभोये, जेष्ठ नेते वामन खरपडे, युवा नेते मिथुन राऊत यांच्यावर विश्वास दाखवुन एकहाती सत्ता संपादन केली. वीस वर्षांपासून असलेली सत्ता कायम राखण्यात रविंद्र भोये यांना यश आले. यावेळी युवा नेते अरुण भोये, संदीप भोये, पोलीस पाटील सुभाष कामडी, सुरेश पाटील, माजी उपसरपंच नामदेव चिमा भोये, सुरेश भाऊसाहेब आदी उपस्थित होते.