जबरी चोरी करणाऱ्या २ जणांना अटक करून वाडीवऱ्हे पोलिसांनी केला गुन्हा उघड

इगतपुरीनामा न्यूज – पतिपत्नी ऍक्टिवा स्कुटीने टिटवाळा मुंबई येथून अंबासनकडे जातांना रात्रीच्यावेळी जात होते. मुंबई नाशिक महामार्गावरील राजूर बहुला शिवारातील निर्मल आश्रमाच्या पुढे फिर्यादीचे पती लघुशंकेसाठी थांबले असताना रस्त्याने समोरून रॉंग साईडने मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ दोन जण आले. त्यांनी स्कुटीची चावी काढत, गच्ची धरून धक्काबुक्की, मारहाण शिविगाळ केली. तेव्हा फिर्यादी महिलेने आरडा ओरड केल्याने लोकांची गर्दी […]

मोडाळे येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षेत २५४ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार एज्युमीट अकॅडमी द्वारा घेण्यात येणारी भारत टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झाली. वाडीवऱ्हे, मोडाळे, सांजेगाव, भावली खुर्द, आडवण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या २५४ विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा दिली. अतिशय खेळीमेळीच्या व नियोजनबद्ध वातावरणात ही परीक्षा संपन्न […]

राष्ट्रवादीच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ जमधडे यांची नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी आज त्यांच्या निवडीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे खंदे समर्थक म्हणून दशरथ जमधडे इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग […]

सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न : राज्यभरातून भाविकांनी घोटीतील सोहळ्यात घेतला सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व सद्गुरु सच्चिदानंद संत रामदास बाबा या थोर संत महात्म्यांचा २७ वा पुण्यतिथी सोहळा राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील सर्व साधक मायबापांच्या उपस्थितीत पार पडला. या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांसह घोटी नगरीत भव्य पालखी सोहळा पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासोबतच […]

१०० दिवसांचा कृती आराखडा – नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ७ कलमी कृती आराखडा

इगतपुरीनामा न्यूज – राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी “क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” निश्चित केलेला आहे. त्या धर्तीवर क्षेत्रीय शासकिय व निमशासकिय कार्यालयाकरीता आगामी १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा तयार करून त्या मुद्दयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे सुविधा पुरविण्याबाबत प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे. […]

हरसुल त्र्यंबक हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी नाशिक शहरातील टोळी अटक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – २९ नोव्हेंबरला रात्री त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे येथील भगवान महाले यांच्या घरामध्ये अज्ञात आरोपींनी संमतीशिवाय प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख २३ हजार १७४ रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याबाबत भान्यासं कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यानंतर हरसुल पोलीस ठाणे हद्दीत १५ डिसेंबरला मध्यरात्री अज्ञात […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी तालुका शाखेचा पुरस्कार सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेतर्फे दरवर्षी इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, शिक्षण क्षेत्र व आदर्श शाळांचा सहावा सन्मान सोहळा गोंदे येथे संपन्न झाला. इगतपुरीचे पहिले आमदार महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या स्मरणार्थ कर्मवीर पुरस्कार व महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष कै. अंबादास वाजे यांच्या स्मरणार्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार व शिक्षक संघाचे नेते […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल शिरसाठ यांची नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाशिक जिल्हा शाखेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते कार्यभार पाहत आहेत. प्राथमिक शिक्षक समिती राज्य अध्यक्ष काळुजी बोरसे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी राज्य कोषाध्यक्ष केदु देशमाने, राज्य उपाध्यक्ष आनंदा […]

अखेर पिंपळगाव मोर सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ ३ वर्षासाठी अपात्र : विभागीय सहनिबंधकांनी कायम केला सहाय्यक निबंधकांचा निकाल

इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२ ते २०२७ काळासाठी संचालक मंडळ निवडीसाठी १५ मे २०२२ ला निवडणूक झाली होती. ह्या निवडणुकीत १२ संचालक निवडून आले परंतु ह्या संचालक मंडळाने ६० दिवसात निवडणूकीचा खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला नाही. म्हणून संस्थेचे सभासद युवराज तुकाराम गातवे यांनी सहाय्यक निबंधक इगतपुरी […]

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी उत्तमराव सहाणे यांच्याकडून जळगावला शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा : साकुर परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली नवनवीन कृषितंत्राची माहिती 

इगतपुरीनामा न्यूज – पारंपरिक शेतीत घाम गाळूनही बळीराजाला शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उन्नती साधायला पाहिजे. याची सर्वांना सर्वांगीण माहिती होण्यासाठी साकुर फाट्यावरील अमृतराज ट्रेडर्सचे संचालक उत्तमराव सहाणे यांच्या संकल्पनेतून जळगावच्या जैन हिल्स येथे शेतकऱ्यांचा दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या […]

error: Content is protected !!