इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसापासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची गंभीर तक्रार केली आहे. मात्र या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने येथील सर्व विद्यार्थी संतापले. आज दुपारी आलेले जेवणही दर्जाहीन असल्याने विद्यार्थ्यांनी टेकडीवरील खड्ड्यात फेकले. आज दुपारपासून सर्व विद्यार्थी उपाशी असल्याचे […]
इगतपुरीनामा न्यूज – रेझिंग डे अर्थात पोलीस स्थापना दिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान केले. पोलीस स्थापना दिवस आणि या दिवशी पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आल्याच्या निमित्ताने दरवर्षी जानेवारीचा पहिला आठवडा रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वाडीवऱ्हे […]
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी तालुका शाखेतर्फे दरवर्षी सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्ती आणि आदर्श शाळांचा सन्मान जानेवारीत केला जातो. या वर्षात तदेण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा तालुका कार्यकारिणीने केली असून शनिवारी ११ जानेवारीला लक्ष्मी लॉन्स गोंदे येथे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. गणेश […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भरवजच्या ग्रामसेविका सुवर्णा छगन आहेर यांच्या विरुद्ध ३० हजाराची लाच स्वीकारल्याने घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार शेती व जमीन खरेदी विक्री खाजगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक येथे अर्ज केला आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो सेवा केंद्र येथील कै. दत्तात्रय सहदेव ठमके वय ८४ यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे ७५ वे मरणोत्तर देहदान आहे.धामणगाव येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाला कुटुंबियांनी कै. दत्तात्रय सहदेव ठमके यांचा देह सुपूर्द केला. […]
इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री माझी शाळा नाशिक तालुका प्रथम आलेल्या विल्होळी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेने पीएमश्री जिल्हा परिषद अध्यक्ष चषकमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. विल्होळी शाळेने सर्व स्पर्धामध्ये भाग घेत प्रथम क्रमांकाचे १४ व द्वितीय क्रमांकचे २ व तृतीय क्रमांकाचे २ अशी बक्षिसे पटकावली सर्व जिल्हा परिषद बिटस्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विल्होळी […]
इगतपुरीनामा न्यूज – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सदस्य नोंदणी व पक्षप्रवेश अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने इगतपुरी तालुका पूर्व भागाची भाजपची कार्यशाळा उत्साहात झाली. त्यात पक्ष संघटन व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या वाटप करण्यात आल्या. पूर्व विभागाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव […]
इगतपुरीनामा न्यूज – बालपणापासून एकमेकांच्या सोबतीने शाळेचे धडे गिरवणारे मित्र म्हणजे संपूर्ण आयुष्यातली खरी कमाई…! चांगल्या वाईट सवयी, अभ्यासाचा छंद, विविध स्पर्धा, खोड्या, मस्ती, कौतुक आणि धक्काबुक्की यांचे विविध प्रसंग नेहमीच दृष्टिपटलावर तरळत असतात. मजेशीर आणि खोडकर जिंदगी म्हणजे विद्यार्थीदशा..! जेवणाचा डबा एकत्र खाण्यातली मजा… सहलीत केलेली धमाल.. शिक्षकांचे खाल्लेले धपाटे असे अनेकानेक दुर्मिळ क्षण […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आपल्या आदर्श आणि सेवाभावी कार्याने सुपरिचित असणारे कुमारशेठ चोरडिया यांची इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सार्थ निवड करण्यात आली आहे. मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले. यावेळी नाशिक जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहेर, उपाध्यक्ष गणेश निकम, अतुल आहेर, गोरख चौधरी, सुरेश […]
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवराय ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे विचार क्रांतीदायक आहेत. समाजाच्या विकासासाठी ह्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा विस्तार करून शिक्षकांनी सुजाण आणि सजग पिढीचे निर्माण करावे. यामध्ये सुजलाम सुफलाम होणाऱ्या भारत देशाचे भविष्य लपलेले आहे. हे भवितव्य घडवण्यासाठी गुणवंत शिक्षकांना दिले जाणारे जिल्हास्तरीय पुरस्कार प्रेरणास्रोत ठरतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती […]