
इगतपुरीनामा न्यूज – बेकायदेशीरपणे ४ बालकामगारांना कामावर ठेवले म्हणून शेणित ता. इगतपुरी येथील एका जणावर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु. र. नं. २९८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४६, अल्पवयीन मुलांची काळजी संरक्षण कलम २०१५ चे ७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. इगतपुरी तालुक्यात शेणित येथील नंदिनी कृपा गुळ उद्योग येथे बेकायदेशीरपणे ४ बालकामगारांना बंधनात ठेवण्यात आले होते. स्वतःच्या फायद्यासाठी बाल मजुरांना कामाला ठेवले याबाबतची फिर्याद कामगार उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी निलेश बाळासाहेब शिवरकर यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी शिवाजी छबू जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा कसून शोध सुरु करण्यात आला आहे.