पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब

इगतपुरीनामा न्यूज – अतिदुर्गम आदिवासी भागातील धामडकी व भगतवाडी जिल्हा परिषद पशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. हिवाळ्याच्या तीव्र थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होण्यासाठी विद्यार्थ्यांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत भगतवाडीच्या शालेय आवारात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झोपाळा, सी-सॉ, घसरगुंडी आदी खेळ साहित्य बसवण्यात आले. या खेळ साहित्याच्या उभारणीसाठी अनामिका, क्लब मॅंचेस्टर ( यूके) यांनी विशेष आर्थिक मदत दिली. प्रगती अजमेरा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात उदघाटन पार पडले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाला चालना मिळणार असून शाळेतील वातावरण अधिक आनंददायी व उत्साही होणार आहे. पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या सदस्यांकडून विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. लहानग्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद व समाधान पाहून उपस्थित मान्यवरही भारावून गेले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भगतवाडीच्या मुख्याध्यापिका विद्या सूर्यवंशी व राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी केले. कार्यक्रमास प्रगती अजमेरा, राधा रुंगठा, सरला मखारिया, अनिता सोनथालिया, मंजू बजाज, रेणू जालान, सुनीता बैद, संतोष मोदी, लुभाविनी सखुजा यांच्यासह दत्तू निसरड, वंदना भगत, गोकुळ आगिवले आदी मान्यवर उपस्थित होते. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरत असून शिक्षणासोबतच माणुसकीची मूल्ये रुजविणारा व समाजाला प्रेरणा देणारा ठरला आहे.

error: Content is protected !!