महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती तळपाडे यांची निवड : राज्य कार्यकारिणी पदग्रहण सोहळा इगतपुरीत संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना बैठक इगतपुरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी समाजाचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न आदी विषयांवर विचार मंथन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी चिंचलेखैरे येथील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश जाधव ( पालघर ) यांच्या अध्यक्षतेख़ाली व राज्यनेते मांगीलाल वळवी, बापूसाहेब लहामटे (कार्याध्यक्ष), रामचंद्र शिंगाडे ( कोषाध्यक्ष ), राज्य उपाध्यक्ष मोहन उंडे, कोषाध्यक्ष आबाजी कांगडे, राज्य नेते भगवंत झोले, प्रताप वळवी, रणजीत पाडवी, कांतीलाल पाडवी, सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत राज्याची नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. यावेळी संपूर्ण राज्यभरात जनसंपर्क असणारे व आदिवासी समाजाबद्दल निष्ठा असणारे नूतन कार्यकारिणी प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती तळपाडे ( नाशिक ), सरचिटणीसपदी मोतीराम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्याध्यक्ष मोहन उंडे ( पुणे ), सुभाष भोईर कोषाध्यक्ष ( पालघर ), उपाध्यक्ष कांतीलाल पाडवी (नंदुरबार), ईश्वर ठाकरे (धुळे), आबाजी भांगरे(अहिल्यानगर ), घिगे सर (ठाणे ), हिरामण चव्हाण पुणे विभाग अध्यक्ष, बाळासाहेब बांबळे नासिक विभाग अध्यक्ष, रामकृष्ण मधे, महासंघटक बबन बांबेरे तर राज्य सल्लागार रणजितसिंग पाडवी, प्रतापसिंग वळवी, रमेशजी जाधव, राज्यनेते मांगीलाल वळवी अशी कार्यकारिणी निवड आली आहे. आदिवासी समाजाचा महत्वाचा घटक आणि समाजाची ऊर्जा असलेली देश घडवणारा आदिवासी शिक्षक फक्त शिक्षकाच्याच मदतीला नाही तर समाजाच्याही जडणघडणीत मोठे योगदान देऊन संपूर्ण राज्यातील शिक्षक संघटित करून समाजासाठी मोठे योगदान देईल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले. मांगीलाल वळवी यांनी नवीन कार्यकारिणीने राज्यभर संघटन करून योगदान देण्याचे आवाहन केले. बापूसाहेब लहामटे यांनी

सर्व आजी माजी पदाधिकारी एक दिलाने हे संघटन मोठे करतील व सामाजिक चळवळीस मोठा हातभार लावतील असे आवाहन केले. बैठकीत नासिक, पालघर, ठाणे, पुणे, नंदुरबार, धूळे, जळगांव, अहिल्यानगर, रायगड जिल्ह्यातुन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊराव बांगर, उत्तम भवारी, कैलास भवारी, दत्ता साबळे, जनार्दन करवंदे, गणेश घारे, मधुकर लोंढे, योगेश गवळी, संजय चव्हाण, संतोष केवारी, गोरक्षे विधाते, सुखदेव साबळे, नवनाथ शिंदे, अमोल बावा, श्याम आदमाने, भाग्यश्री जोशी, गोरख तारडे, सखाराम भांगरे, रंगनाथ बागुल, भोये सर, धोबी सर, अंकुश तळपे, शिरीष कुमार पाडवी, हिरामण चव्हाण यांनी परिश्रम घेतले. निवडीबद्दल आमदार हिरामण खोसकर, डॉ. जयंत कोरडे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यभर ७६ हजार शिक्षकाचे संघटन असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक आदिवासी शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी झालेली माझी निवड मी माझ्या राज्यभरातल्या जनसंपर्काच्या माध्यमातून शिक्षकांना संघटित करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील काळात शिक्षण क्षेत्राला दिशा देण्यासाठी राज्य अधिवेशन घेऊन शिक्षकांचे व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय व लोकप्रतिनिधींना एकत्र करणार आहे. - निवृत्ती तळपाडे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना
error: Content is protected !!