इगतपुरी शहराचा खराखुरा आयडॉल – नगरसेवक भूषण जाधव 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरासाठी सामाजिक, आरोग्य क्षेत्र आणि सामान्य माणसाला केंद्रिभूत मानून विविधांगी कामे करण्यासाठी अखंडित झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजे नगरसेवक भूषण प्रभाकर जाधव. इगतपुरी शहरासह प्रभागातील नागरिकांसाठी तत्परतेने कामे करण्यात हातखंडा असणाऱ्या भूषण जाधव यांची नवी ओळख नगरसेवक पदापर्यंत पोहोचली आहे. ही ओळख मिळण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास अजिबात सुलभ नव्हता. दिग्गज पक्ष आणि दिग्गज व्यक्ती रिंगणात असूनही भूषण जाधव ह्या युवकाने मारलेली बाजी अतिशय लक्षवेधी ठरली. अर्थातच जनतेत केलेली कामे आणि आशीर्वाद यांच्या जोरावर भूषण जाधव यांचा विजय झाला. विविध क्षेत्रातील अनेक  कामांच्या योगदानामुळेच नगरसेवक भूषण जाधव यांना इगतपुरी शहराचा खराखुरा आयडॉल म्हणूनही नवी ओळख प्राप्त झाली आहे. भूषण जाधव यांचा आज वाढदिवस.. त्याच्यासारख्या व्यक्तिमत्वांमुळे इगतपुरीची मान अभिमानाने उंचावली जाते. साधेपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भूषण जाधव. नगरसेवक असलेला हा युवक कोणत्याही गाजावाज्याशिवाय, शांतपणे पण ठामपणे समाजासाठी उभा राहिलेला दिसतो. सामान्य कुटुंबातील नगरसेवक भूषण जाधवची खरी ओळख पदामुळे नाही तर त्याच्या दर्जेदार सामाजिक कामांमुळे निर्माण झाली आहे.

भूषण जाधव केवळ नगरसेवक नाही, तर तो एक रुग्णसेवक, समाजसेवक आणि आरोग्यदूत आहे. लोकांच्या आजारपणात धावून जाणारा, गरजूंना आधार देणारा आणि संकटाच्या वेळी पुढे उभा राहणारा देवदूत आहे. दिवस असो वा रात्र, वेळ पाहत नाही ; कोणाचीही हाक आली की तो तत्काळ मदतीला धावून जातो. अनेकांसाठी तो एक फोन कॉलवर उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे ही त्याची वृत्ती आहे. आनंदाच्या क्षणी शुभेच्छा देणारा आणि दुःखाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा भूषण जाधव लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतो. त्याची सेवा ही प्रसिद्धीसाठी नाही, तर माणुसकीसाठी आहे. इगतपुरी शहरात विविध क्षेत्रात अनेक व्यक्ती आपले सामाजिक दायित्व पार पाडत असतात. ते सर्वजण इगतपुरीचे आयडॉल आहेतच. त्यापैकीच नगरसेवक भूषण जाधव हा सुद्धा इगतपुरीचा खराखुरा आयडॉल म्हणून ओळखला जात आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. हा दिवस निव्वळ वैयक्तिक आनंदाचा नसून, समाजासाठी अधिक जबाबदारी स्वीकारण्याचे संकल्प करण्याचा दिवस आहे. त्याच्या हातून अशीच सेवाभावी कामे घडत राहोत, लोकांचा विश्वास अधिक दृढ होवो आणि त्याच्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडो ही सदिच्छा. तुमचे कार्य असेच अखंड सुरू राहो आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही समाजाचे खरे भूषण ठरोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भूषण..!

error: Content is protected !!