
इगतपुरीनामा न्यूज – मंगळवारी ६ जानेवारीला मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मिडिया इगतपुरी तर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कला व वाणिज्य महाविद्यालय, महात्मा गांधी हायस्कूल कॅम्पस, इगतपुरी येथे संपन्न झाला. कार्यक्रमात इगतपुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा संरक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला, ही बाब पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अत्यंत कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमात पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करताना त्यांच्या सुरक्षिततेविषयी सकारात्मक संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे सामाजिक दायित्व अधोरेखित करत निःपक्ष व निर्भीड पत्रकारिता टिकविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ संप्रदाय भारतचे पिठाधीश्वर श्री श्री श्री कल्कीराम महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, उद्योजक प्रशांत कडू, नूतन नगराध्यक्ष शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, माजी नगराध्यक्ष जनाबाई खातळे, नगरसेवक भारती शिरोळे, भूषण जाधव, उमेश कस्तुरे, मयुरी पुरोहित, निकत सय्यद, आशा थोरात, राज जावरे, रोहिदास डावखर, सागर आढार, मनसे तालुकाध्यक्ष रामदास आडोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, प्राचार्या प्रतिभा हिरे, भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, वसीम सय्यद, विजय कातोरे, रमेश राठी, प्रमोद व्यास आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सोनवणे, जेष्ठ पत्रकार राजू देवळेकर, इगतपुरी तालुकाध्यक्ष विकास काजळे, डिजिटल सेल तालुकाध्यक्ष संदीप कोतकर, शहराध्यक्ष सुमित बोधक, डिजिटल सेल शहराध्यक्ष गणेश घाटकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष शहाबाज शेख, खजिनदार शैलेश पुरोहित, वैभव तुपे, समाधान कडवे, लक्ष्मण सोनवणे, शरद धोंगडे, एकनाथ शिंदे, गौरव परदेशी, मिलिंद सोनवणे, शांताराम भांगे, लक्ष्मीकांत शिंदे, भगीरथ आतकरी, प्रशांत निकाळे, निलेश काळे, प्रथमेश गोडे आदींनी परिश्रम घेतले.