इगतपुरी तालुक्यात ऐतिहासिक १४५ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान : केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित इगतपुरी तालुका केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी वाचू शकणाऱ्यांचा प्राण धोक्यात आलेला आहे. रक्ताचे संकलन होणे काळाची गरज असून यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लागतो. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर ७५ हजार रक्त पिशव्या जमा करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यानुसार नाशिक जिल्हा […]

५ वर्षांपूर्वीच वैतरणाच्या अतिरिक्त जमिनी लिलावाचा ठराव झालाय मंजूर : असहाय्य शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पूर्ण होणार का ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा धरण प्रकल्पासाठी तत्कालीन काळात संपादित झालेली ६२३ हेक्टर जमीन प्रत्यक्षात धरणासाठी वापरात नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेली ही जमीन मूळ मालक शेतकऱ्यांना परत करावी ही दीर्घकाळाची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर ह्यांनी ह्या प्रकरणी अधिवेशनात विषय मांडला. मात्र कोकण पाटबंधारे मंडळाने २०२० मध्येच ह्या जमिनी जाहीर […]

नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स असोसिएशनच्या स्पर्धेत त्र्यंबकराज ॲथॅलेटिक ग्रुपने मिळविले उपविजेतेपद

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आणि व्ही डी के स्पोर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात दोन दिवसीय सब ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ७, ८,१२, १४ आणि १६ वर्ष वयोगटातील मुले आणि मुली वयोगटाचा समावेश होता. यामध्ये त्र्यंबकराज ॲथॅलेटिक ग्रुपने आपला दबदबा कायम […]

इगतपुरीत दुकानाला आग आणि सिन्नर महामार्गावर ट्रक पेटला : इगतपुरी तालुक्यात आग लागण्याच्या २ घटना

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आज आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन्हीही घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमाराला घोटी सिन्नर महामार्गावरील पिंपळगाव मोर येथे कॉइल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला लावला. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणावर […]

शासकीय योजनांचा शेतकऱ्यांपर्यत जलद गतीने लाभ देण्यासाठी फार्मर आयडी योजना – तहसीलदार अभिजित बारवकर

किरण रायकर : इगतपुरीनामा न्यूज – शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यत जलद गतीने परिणामकारकपणे पोहचविता यावा. यासह कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्टॅक ( डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर ) योजना राज्यात राबवण्यात येत आहे. या योजनेनुसार इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करुन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यासाठी नियोजन करण्याच्या […]

ग्रामपंचायत निवडणुक लढवायची आहे ? उमेदवारीसाठी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – आपल्या गावाच्या विकासासाठी अनेकांना ग्रामपंचायतीची निवडणुक लढायची असते. यावर आपला वरचष्मा राखण्यासाठी अनेकानेक प्रकारे क्लुप्त्या वापराव्या लागतात. मतदार अर्थात गावकरी आणि युवकांची मर्जी संपादन करावी लागते. थेट सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून यावे यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जातात. उपसरपंच पदासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न केला जातो. मात्र ही निवडणुक लढवण्यासाठी निवडणुकीची घोषणा झाल्यावर […]

इगतपुरी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रंगणार निवडणुकांची रणधुमाळी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील २३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी याबाबत झालेल्या बैठकीत आरक्षण निश्चित केल्याची घोषणा केली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची दाट शक्यता असून ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाचवेळी घोषित होण्याचा अंदाज आहे. बराच काळ प्रशासकीय राजवट असल्याने ग्रामीण भागातील राजकारण […]

पाणलोट कामांच्या माध्यमातुन वेळुंजेचा करणार सर्वांगीण विकास : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त “जयहिंद लोकचळवळ”ची संकल्पना

इगतपुरीनामा न्यूज – वेळुंजे येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. डॉ. सुधीर तांबे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. डॉ. तांबे हे “जयहिंद लोकचळवळ” या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून संस्थेमार्फत वेळुंजे गावचे ग्रामीण सहभागीय मूल्य अवलोकन, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, […]

एसएमबीटीजवळ भीषण अपघातात बालिकेसह ३ जण ठार, २ जण गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या MH05 FW 0030 ह्या क्रमांकाच्या रिक्षाला समोरून येणारा NL01 AF 0458 हा कंटेनर न दिसल्याने रिक्षाने कंटेनरला धडक दिली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय २५ रा. नांदवली, कल्याण हा […]

आमच्या हक्काच्या जमिनी परत करा, संपादित जमिनीचां लिलाव कराल तर शेतकरी रस्त्यावर उतरेल : आवळी दुमालाचे माजी सरपंच पंढरीनाथ जमधडे यांचा इशारा

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा दगडी धरणासाठी संपादित मात्र वापराअभावी पडुन असलेल्या अतिरिक्त जमिनींचा लिलाव होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे आवळीसह परिसरातील बाधित असणाऱ्या तब्बल वीस ते बावीस गावामधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असुन प्रकल्पबाधित हवालदिल झालेले आहे. या जमिनी आमच्या हक्काच्या असुन आम्ही त्यांचा लिलाव होऊ देणार नाही. शासनदरबारी तसे प्रयत्न झाल्यास […]

error: Content is protected !!