
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्रविण प्रशिक्षक संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील कैलास बाळकृष्ण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. यशदा पुणे व रा. ग्रा. पं. राज संस्थान हैद्राबाद अशा मोठ्या संस्थांचे प्रविण प्रशिक्षक म्हणून श्री. चौधरी कार्यरत आहे. ते त्यांच्या वेगळ्या शैलीत महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये सरपंच ट्रेनिंग व पेसा कायदा, १५ वा वित्त आयोग, सूक्ष्म नियोजन शिक्षण विभाग, पाणलोट, उपजीविका, महिला बचत गटांना चाळीस उद्योग व बकरी पालन कुक्कुट पालन असे विविध प्रशिक्षण देत असतात. जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेशी निगडित स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या विषयावर जिल्हाभरात प्रशिक्षण देत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी व योग्य संधी आपल्या मार्फत मिळावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन. माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवीन असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष जिल्हा समन्वयक नितीन गोवर्धन, मनोहर सरोदे, प्रवीण चव्हाण, गगन गिरी, मीनाक्षी शेगावकर, उमाकांत पाटील, दीपक मोरे, शशिकांत पवार, मारुती बनसोडे, महेंद्र मेश्राम, जान्हवी रंगडाले, मानसिंग सावरे, दिलीप निकम, मनोज सोनवणे आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.