इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्षीय नेते सरसावले आहे. यात युवकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी संस्थेत इन्ट्री होताना दिसत आहे. तर आजी-माजी आमदार समोरासमोर येत असल्यामुळे ह्या निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष लागून आहे. आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाजार समिती आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते. आतापर्यंत २६६ अर्ज […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील मोगरे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणूकीत इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, श्रावण जाखेरे, पांडुमामा जाखेरे यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद यश मिळवले आहे. ह्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर विजय मिळवला. निवडून आलेल्या संचालकांत देविदास जाधव, यशवंत उगले, रुपाबाई […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – नाशिक जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल आणि राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. ह्या निवडणुकीसाठी इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. रमेश जाधव यांनी सोसायटी गटातील आरक्षित जागेवर हा अर्ज दाखल केला. याप्रसंगी जेष्ठ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणी ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या रंजना लाड यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने सरला नारायण भोसले ह्यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, गौतम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच बन्सी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगांव मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, पिंपळगांव मोर या सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमनसह संपूर्ण १२ संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर केला नसल्याने संपूर्ण सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे जिल्हाभरात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीकडून घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी निवडणुकीचे फॉर्म घेऊन बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्यात येणार असल्याचा संदेश देण्यात आला. निवडणूक लढण्याच्या तयारीसाठी आणि त्यासंदर्भात नियोजनासाठी घोटी येथे तालुका पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जिल्हा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – राजकीय मतभेद बाजुला सारुन संस्था वाढीस लागावी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे ऋण व्यक्त करतो असे प्रतिपादन मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी घोटी येथे केले. मुकणे ग्रामपंचायतीतर्फे खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन माजी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – उच्च न्यायालयाकडून बाजार समिती निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले होते. या आदेशामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम आता वाजले आहे. २७ मार्चला घोटी कृषी उत्पन्न […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – महाराष्ट्रातील ज्या बाजार समित्यांची मुदत संपून निवडणुका घेणे आवश्यक आहे त्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून आज महाराष्ट्र बाजार समिती निवडणूक प्राधिकरणाला आदेश निर्गमित करण्यात आला. ह्या निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. अनेक याचिकांची एकत्रित सुनावणी […]