इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यातील खंबाळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची चेअरमन, व्हा चेअरमन पदाची निवडणूक इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले व व्हॉइस चेअरमनपदी कचरू नामदेव शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी खंडुसिंग शामसिंग परदेशी, व्हॉइस चेअरमन पदासाठी दिलीप विष्णु चौधरी सूचक होते. दोन्ही जागासाठी एक एक अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. शिंदे यांनी घोषित केले. माजी आमदार शिवराम झोले, खंडुसिंग परदेशी, दिलीप चौधरी आदींनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले. मागील महिन्यात संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी ज्ञानेश्वर कडाळी, केरू देवकर, देवराम डहाळे, दिलीप चौधरी, खंडूसिंग परदेशी, गंगाराम गिऱ्हे, हरी आवाली, संजय रोकडे, दौलत शिद, मंगलबाई कडाळे, लिलाबाई डहाळे हे संचालक हजर होते. कैलास चौधरी, ज्ञानेश्वर पढेर, नारायण चौधरी, सरपंच द्वारका शिद, विठ्ठल शिंगोटे, समाधान शिंगोटे, राजू देवकर, प्रहार संघटना नेते सपन परदेशी, नितीन शिंगोटे, भाऊसाहेब डहाळे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group